
पदाचा गौरव वाढेल अशी कामगिरी करा : उपमुख्यमंत्री अजित पवार
नाशिक : मुंबई येथे झालेल्या दहशतवादी ह्ल्लयामध्ये शहीद झालेल्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तुकाराम ओंबळे यांनी आपल्या कामगिरीने महाराष्ट्र पोलीस दलाची शान वाढविली. पद, कामगिरीनेच माणूस हा सरस ठरत असल्याने आपण देखील पोलीस उपनिरीक्षक म्हणून आपली जबाबदारीपार पाडत असताना आपल्या पदाचा गौरव कसा वाढेल असेच काम करा असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.
येथील महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक सत्र क्रमांक ११९ व्या बॅचचा दीक्षांत संचलन सोहळा हा पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी गृहमंत्री दिलिप वळसे, पालकमंत्री छगन भुजबळ, अपर पोलीस महासंचालक संजीवकुमार, पोलीस अकादमी संचालक राजेशकुमार, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी गंगाथरण. डी., पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी.जी.शेखर, पोलीस अधीक्षक सचिन पाटील आदी उपस्थित होते.
श्री. पवार म्हणाले, की पोलीस उपनिरीक्षक म्हणून काम करतांना प्रत्येक अधिकाऱ्याने आता आपण शासनाचे सेवक आहोत हे जाणून घेत सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींना प्राधान्य देत त्यांची सोडवणूक करा. पदाची जबाबदारी प्रामाणिपणे पार पाडत असतान प्रत्येक तक्रार प्रश्नाला कायद्याच्या बांबू न टाकत माणूसकीच्या नात्यातून, बंधूत्वाची भावान जोपसात सोडविण्याचा प्रयत्न करा. आपण सर्व हे सर्वसामान्य, कष्टकरी, शेतकरी कुटुंबातून आलो आहे. याची जाणीव ठेवत सर्वांच्या वेळेचे महत्व त्यांना पोलीस ठाण्याच्या चकरा मारायला भाग पाडू नका. आपले सर्व उच्चशिक्षित असल्याने आपल्या ज्ञानाचा, अनुभवाचा फायदा समाजाला कसा करुन देता येईल हे पहा. आपली जबाबदारी पार पाडत असताना कुठल्याही प्रकारची राजकीय दबावाला बळी न पडता जे योग्य आहे तेच करा. या सर्वांमध्ये भ्रष्टाचार करुन आपली व आपल्या कुटुंबाची मान शरमेने खाली जाईल असे वागू नका असा सल्ला देखील यावेळी त्यांनी दिला.
चुकीच्या कामांना पाठिंबा न देवू नका
गृहमंत्री वळसे यांनी देखील मार्गदर्शन करत सांगितले, की आपण सर्वांनी पोलीस खात्याची निवड जाणीवपूर्वक केली असल्याने जनसामान्यमध्ये पोलीस दलाप्रती आदर वाढेल असेच काम करा. प्रत्येक जनसामान्यांच्या तक्रारीची दखल घ्या. गणवेशाची प्रतिष्ठा जपा कारण समाजामध्ये आपले अस्तीत्व यामुळे ठळकपणे उमटत असते. त्यामुळे चुकीच्या कामांना पाठिंबा न देवू नका, मोहाला बळी पडू नका. आता जग वेगाने विकसित होत आहे. त्यामुळे कामाबरोबर तंत्रज्ञानात स्वत:ला अपडेट ठेवा असेही श्री. वळसे यांनी सांगितले. यावेळी त्यांना महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या विकासाला आवश्यक असलेल्या सर्व गरजा पूर्ण करण्याचे आश्वासन देखील दिले.
उत्कृष्ठ प्रशिक्षणार्थी
११९ व्या प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक (खात्यातंर्गत) दीक्षांत संचलन सोहळ्याप्रसंगी उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी व बेस्ट ट्रेनि ऑफ द बॅच सोर्ड ऑफ रिव्हॉलवरचा मान गणेश चव्हाण यांना देवून गौरविण्यात आले. उत्कृष्ठ प्रशिक्षणार्थी महिला पुरस्काराच मान तेजश्री म्हैसाळे यांना मिळाला. द्वितीय क्रमांकाचा उत्कृष्ठ प्रशिक्षणार्थीचा पुरस्कार विशाल मिंढे यांना स्टडीज सिल्वर बॅटेन पुरस्काराने प्रतापसिंह डोंगरे यांना देवून गौरविण्यात आले.
हेही वाचा: मुख्यमंत्री महोदय, इकडे लक्ष द्यावे....!
मुख्यमंत्र्यांसह गृहराज्यमंत्र्यांची अनुपस्थिती
११९ व्या प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक दीक्षांत संचलन सोहळ्यास प्रमुख पाहूणे म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार होते. मात्र त्यांचा नाशिक दौरा रद्द झाल्यानंतर ते सोहळ्यास ऑनलाईन उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र काही कारणास्तव ते ऑनलाईन देखील कार्यक्रमास उपस्थित राहिले नाही. तसेच राज्याचे गृहराज्यमंत्री सत्तेज पाटील (शहर) आणि शंभुराजे देसाई (ग्रामीण) हे दोघेही कार्यक्रमास अनुपस्थितीत राहिले.
हेही वाचा: नाशिक : शहरातील बाराशेवर घरे 'धोकादायक'
कार्यक्रमातील ठळक मुद्दे
- पोलीस अकादमीतील सराव इमारतीला शंभर टक्के निधी देणार
- राज्यातील जुन्या ८७ पोलीस ठाण्याचे नूतनीकरण
-प्रत्येक पोलीस शिपाई हा अधिकारी होवूनच होणार सेवानिवृत्त
- पोलीसांना आता आठ तासांची ड्युटी
-टप्प्या टप्प्याने राज्यात पोलीसांसाठी १ लाख घरे
- अर्थसंकल्पामध्ये पोलीस दलाला कोट्यावधीचा निधी
- पीटीसीला निधीची टंचाई भासू देणार नाही
Web Title: Convocation Ceremony Of Maharashtra Police Academy Was Held In Nashik
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..