Nashik ZP News
Nashik ZP News esakal

Nashik ZP News: जिल्हा परिषदेची समन्वय सभा मुख्यालयाबाहेर; कार्यालयात सुटीचे वातावरण

Nashik ZP News : जिल्हा परिषदेची प्रशासन विभागप्रमुख, गटविकास अधिकारी यांची समन्वय सभा सह्याद्री फार्मवर (मोहाडी, ता. दिंडोरी) भरविण्यात आली होती. मुख्यालयातील विभागप्रमुख सकाळपासूनच या बैठकीसाठी गेले होते.

प्रमुख अधिकारी नसल्याने जिल्हा परिषदेतील कर्मचारीही दुपारपासून जागेवर नव्हते. त्यामुळे जिल्हा परिषदेत शुक्रवारी (ता. ३) जणू काही सुटीचे वातावरण होते. (Coordination meeting of Zilla Parishad outside headquarters nashik news)

दरम्यान, मुख्यालय सोडून बाहेर खासगी जागेत शासकीय सभा नेमकी कशासाठी, असा प्रश्न कर्मचारी व अधिकारी वर्गाकडून उपस्थित होत आहे.

जिल्हा परिषदेतील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत समन्वय सभा होत असतात. यात सर्व विभागांच्या प्रमुखांसह तालुका गटविकास अधिकारी उपस्थित असतात. साधारण सर्वच शासकीय योजना अन्‌ प्रशासकीय कामकाजाचा आढावा बैठकीत होत असतो. जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली ही सभा आतापर्यंत जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात होत आलेली आहे.

मात्र, यंदा ही समन्वय सभा जिल्हा परिषदेच्या मुख्यालय बाहेर झाली. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री फार्मवर शुक्रवारी सभा झाली. बैठकीत विविध योजनांचा सविस्तर आढावा झाला. बैठकीला हजेरी लावण्यासाठी सर्व विभागप्रमुख सकाळपासून गेलेले होते.

Nashik ZP News
Nashik News: जिल्ह्यात दुबार मतदार यादीत शिक्षक, सरकारी कर्मचारी आढळल्यास कारवाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

बैठक बाहेर झाल्याने याचा मुख्यालयातील कामकाजावर परिणाम झाला. विभागप्रमुख मुख्यालयात नसल्याने अनेक टेबलांवर कर्मचारी हजर नव्हते. शनिवार, रविवार सलग सुटी असल्याने दुपारपासूच अनेक कर्मचारी गायब झाल्याचे चित्र होते. उपस्थित कर्मचारीही कार्यालयापेक्षा बाहेरच फिरताना दिसत होते. अधिकारी, कर्मचारी नसल्याने जिल्हाभरातून आलेल्या सामान्यांचे हाल झाले.

"जिल्हा परिषदेची समन्वय सभा सह्याद्री फार्मवर घेण्यात आली. मुख्यालयात विभागप्रमुख सतत कामात व्यस्त असतात. मोकळ्या वातावरणात व मोकळी चर्चा व्हावी, यासाठी येथे सभा घेण्यात आली. बैठकीत नरेगासह सर्व योजनांवर प्रामुख्याने सविस्तर चर्चा झाली. कामकाजाबाबत अनेक सूचना या वेळी देण्यात आल्या. सर्व विभागप्रमुखांनी सह्याद्री फार्मला भेट दिली. गटविकास अधिकाऱ्यांची कार्यशाळाही या वेळी झाली." - आशिमा मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

Nashik ZP News
Nashik Fraud: प्रशांत,अपूर्व व अद्वैय हिरे यांच्याकडून फसवणूक; खोटे कागदपत्रे दाखल करून कर्मचाऱ्यांची भरती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com