Nashik Fraud: प्रशांत,अपूर्व व अद्वैय हिरे यांच्याकडून फसवणूक; खोटे कागदपत्रे दाखल करून कर्मचाऱ्यांची भरती

Recruitment of 40 employees in organization by submitting false documents from Prashant Apoorva and Advaiya Hiray nashik fraud news
Recruitment of 40 employees in organization by submitting false documents from Prashant Apoorva and Advaiya Hiray nashik fraud newsesakal

Nashik Fraud : माजी मंत्री प्रशांत हिरे यांच्या कुटुंबीयांच्या महात्मा गांधी विद्यामंदिर, आदिवासी सेवा समिती संस्थेत शासकीय नियम डावलून ४० शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करत शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात संस्था चालकांसह माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(Recruitment of 40 employees in organization by submitting false documents from Prashant Apoorva and Advaiya Hiray nashik fraud news)

शिक्षण उपसंचालक कार्यालयातील शिक्षण उपनिरीक्षक किरण कुंवर यांनी फिर्याद दिली आहे. संस्थेविरोधात गुन्हा दाखल झाल्याने शैक्षणिक क्षेत्रासह राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली असून या निमित्ताने मालेगाव मधील राजकीय संघर्ष व्यक्तिगत पातळीवर आल्याचे दिसून येत आहे.

भद्रकाली पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित माध्यमिक शाळांमध्ये २२ शिक्षक, १२ शिपाई व ६ लिपिकांची सन २०२० भरती करण्यात आली होती. राबविण्यात आलेल्या भरती प्रक्रियेतील शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती बेकायदेशीर असल्याचे लेखी तक्रार पालकमंत्री दादा भुसे यांनी १७ जानेवारी २०२३ रोजी शालेय शिक्षण विभागाकडे केली होती.

या तक्रारींची आधारे २ फेब्रुवारी २०२३ रोजी भरती प्रक्रियेच्या चौकशीचे आदेश शालेय शिक्षण विभागाने दिले. चौकशी आदेशानंतर, शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून भरती प्रक्रियेची चौकशी करण्यात आली. यात संबंधित संस्था, शिक्षक, कर्मचारी यांच्या समोर ५, ६ तसेच २० एप्रिल २०२३ आणि २९ मे २०२३ रोजी सुनावणी देखील घेण्यात आली. या सुनावणी अंती संबंधित कर्मचाऱ्यांची वैयक्तीक मान्यता रद्द करण्याचे आदेश शिक्षण उपसंचालकांनी दिले.

Recruitment of 40 employees in organization by submitting false documents from Prashant Apoorva and Advaiya Hiray nashik fraud news
Nashik News: सायबर सेलकडून सोशल मीडियावर ‘वॉच’; आक्षेपार्ह संदेश व्हायरल न करण्याचे आवाहन

शिक्षण उपसंचालक यांनी या प्रकरणी ९ ऑक्टोंबर २०२३ रोजी अंतिम निर्णय दिला. यात भरती प्रक्रीया राबविताना संस्थेने आरक्षण धोरणाचे पालन केलेले नाही, जाहिरात प्रसिद्ध न करता भरती प्रक्रीया करण्यात आली तसेच भरती प्रक्रियेचा अवलंब केलेला नसल्याचा ठपका ठेवत, कर्मचारी भरतीला संस्थेचे विश्वस्त मंडळ आणि या प्रकरणी तत्कालीन (आताचे विद्यमान) माध्यमिक शिक्षणाधिकारी यांचा हलगर्जीपणा जबाबदार असल्याचा निर्णय दिला.

भरती प्रक्रियेत दोषी ठरविण्यात आल्यानंतर शिक्षण उपसंचालक कार्यालयातील शिक्षण उपनिरीक्षक कुंवर यांनी भरती प्रक्रियेत खोटी कागदपत्रे दाखल करत शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी माध्यमिक शिक्षणाधिकारी, संस्थेविरोधात हा गुन्हा दाखल केला आहे.

यांच्या विरोधात झाला गुन्हा दाखल

पुष्पाताई हिरे, पंडित दगा नेरे (उपाध्यक्ष), स्मिता हिरे (कोषाध्यक्ष), प्रशांत हिरे (सेक्रेटरी), दीपक सूर्यवंशी (जाईन सेक्रेटरी), अपूर्व हिरे (सभासद), अव्दय हिरे (सभासद), प्रमोद भार्गवे (सभासद) प्रदीप सराफ, मनोज बदियानी, अरुण उदगीरकर, उदय शिंदे, योगिता हिरे, संपदा हिरे, ललिता भार्गवे यांसह तब्बल ६६ व्यक्तीविरोधात शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुरुवारी (ता.२) रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे यात माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्यावरही ठपका ठेवला असल्याने त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

Recruitment of 40 employees in organization by submitting false documents from Prashant Apoorva and Advaiya Hiray nashik fraud news
Nashik Fake Doctors: नांदगावला बोगस डॉक्टरांच्या संख्येत वाढ! तालुक्यात 74 मुन्नाभाई कार्यरत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com