esakal | नाशिक ढोल पथकांच्या निनादाला कोरोनाचा ब्रेक! ‘काम देता काम’ बोलण्याची आली वेळ
sakal

बोलून बातमी शोधा

nashik dhol

नाशिक ढोल पथकांच्या निनादाला कोरोनाचा ब्रेक!

sakal_logo
By
तुषार महाले

नाशिक : गणेशोत्सवात (ganeshotsav festival 2021) सार्वजनिक कार्यक्रमांना गतवर्षाप्रमाणे यंदाही परवानगी नसल्याने जगाच्या कानाकोपऱ्यात नाशिक ढोलपथकातील (nashik dhol) वादकांचे प्रचंड नुकसान होत आहे. कोरोनामुळे गतवर्षापासून सर्वच गोष्टींवर मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. सण समारंभ, उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केले जातात. गणेशोत्सवावर अनेक घटक अवलंबून असतात. त्यातीलच एक घटक म्हणजे नाशिक ढोलपथक. बाप्पांच्या आगमन, विसर्जनावेळी वाजत गाजत बाप्पाची मिरवणूकही काढली जाते. त्यात नाशिकच्या ढोलच्या आवाजाचा सर्वदूर निनाद होतो. गतवर्षाप्रमाणे यंदाही नाशिकमध्ये ढोल पथकांचा निनाद घुमणार नसून ढोल वादकांना काम देता काम असे बोलण्याची वेळ आली आहे.

‘काम देता काम’ असे बोलण्याची आली वेळ

गतवर्षापासून ढोल वादकांना मिरवणुकीची परवानगी नसल्यामुळे ध्वज वाजवणे, मर्दानी खेळ दाखविणे सगळे बंद आहे. यामुळे नवीन वादकांमधील गोडी कमी झाली असून ते ढोलपथकापासून दुरावले गेल्याचे चित्र आहे. नाशिकमध्ये लसीकरण झालेल्या ढोल वादकांना मोजक्या वादकांमध्ये गणेशोत्सवात स्थिर वाद्यासाठी परवानगी मिळावी, अशी आशा ढोल वादकांची प्रशासनाकडून आहे. मल्हार गजर ढोल पथकात ८० वादक आहे परंतु त्यांच्याकडे गतवर्षापासून काम नसून सरावही बंद असल्याने ढोलचे साहित्य धुळखात पडून आहे. बाहेरील राज्यात ढोल पथकाला परवानगी आहे, परंतु महाराष्ट्रात का नाही असाही प्रश्‍न ढोल वादकांनी उपस्थित केला आहे.

शिवजयंती, गणेशोत्सवातील मिरवणुकींच्या माध्यमातून अर्थार्जन होते. परंतु गतवर्षापासून मिरवणुका बंद असल्यामुळे नुकसान होत आहे. गणेशोत्सवात मिरवणुकीला परवानगी नाकारली असली तरी ढोल वादकांचे लसीकरण झाले आहे, अशा मोजक्या ढोल वादकांना स्थिर वादनाला परवानगी मिळावी. - प्रणव शिंदे, ढोल वादक

गतवर्षापासून मिरवणूक वादनाला परवानगी नाही, सरावही बंद असल्यामुळे ढोलाला लागणारे साहित्याला गंज लागला आहे. ढोलाला लागणारे चामडी पान पथकांना परवानगी मिळेल, या आशेने लाख रुपये कर्ज काढून विकत घेतले होते. ते कर्ज डोक्यावर आहे. कर्ज कसे फेडावे असा प्रश्‍न पडला आहे. - प्रशांत गोसावी, ढोल वादक

हेही वाचा: टोमॅटो, कांदा, बटाटाचे ‘टॉप’चे भाव गडगडले! योजना कागदावरच

गणेशोत्सवाच्या तीन महिन्याआधी वाद्यपुजन झाल्यानंतर ढोल वादकांची सरावाला सुरुवात होते. गतवर्षापासून सगळे बंद आहे. यावर्षी शिवजयंतीसह गणेशोत्सवालाही परवानगी नसल्याने ज्यांना ढोल वादनाची आवड, उत्साही होते ते ढोल पथकापासून दुरावले आहेत. - ईश्‍वर शहा, ढोल वादक

हेही वाचा: यंदाचा बैलपोळा काळजात धस्स करणारा; एरंडगावात शोककळा

loading image
go to top