80 हून अधिक कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणारा कोरोना योध्दा!

रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानून काम करणारे मदतीचे हात पुढे
tushar shinde
tushar shindeesakal

निफाड (जि.नाशिक) : कोरोना काळात (corona virus) प्रेताच्या टाळुवरील लोणी खाणारे महाभाग समोर येत असतांना रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानून काम करणारे मदतीचे (helping hands) हात पुढे करत आहे. या काळात नगरपंचायत कर्मचारी तुषार दत्तु शिंदे गेल्या दोन वर्षापासुन कोविड योद्धा म्हणुन कार्यरत असुन या काळात रक्ताची नाते देखिल मदतीला येत नसतांना अशा कालावधीत 80 हुन अधिक कोरोनामुळे मृत झालेल्या कोरोनाग्रस्त मृतदेहांवर अंतिम संस्कार केले आहे. या कोरोनायोद्ध्याच्या कामाचे निफाडकर कौतुक करत आहे (corona fighter from niphad nashik marathi news)

tushar shinde
नाशिक जिल्ह्यातील डोंगराळ भागात भुकंपाचे धक्के; नागरिकांत भीती

कोरोनाग्रस्तांच्या मदतीपासुन अग्निसंस्कारापर्यत काम करणारा निफाडचा कोरोना योद्धा

निफाड शहरात गेल्या दोन वर्षापासुन कोविडचे थैमान पसरले आहे अशातच निफाड नगरपंचायत रुग्णवाहिका कर्मचारी तुषार दत्तू शिंदे. हे महामारीच्या काळात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या जवळ जायला रक्ताच्या नात्यातील माणसं सुद्धा मागे सरतात. अशा परिस्थितीत निफाड येथील तरुण कोरोनायोद्धा तुषार दतू शिंदे हा युवक कुठल्याही परिस्थितीला न घाबरता कोरोनाग्रस्त रुग्णाच्या प्रथमोपचार पासून ते अंतिम संस्काराच्या अग्निडागापर्यंत देत सामाजिक दायित्व निभावत आहे विषेश म्हणजे हि सेवा करत असतांना आपले कुटुंबिय कोरोनाबाधित होऊनही स्वतःच्या कुटुंबीयांचा कुठलाही विचार न करता फक्त आणि फक्त समाजसेवेच्या भावनेतून अविरत न थकता न थांबता करोणाग्रस्थांच्या मदतीसाठी रात्रंदिवस काम करतोय तो जणु कोरोनाग्रस्तां मृतदेहांसाठी देवदुतच बनला आहे

tushar shinde
अचूक वीजबिल हवंय? कोरोना काळात महावितरणची विशेष सुविधा

सामाजिक कर्तव्य

कोरोना महामारीच संकट भयंकर आहे. अशा काळात आपले आप्तस्वकीय देखिल रुग्णांच्या मदतीला धजावत नाही. अशा परिस्थीतीत अनेकजण आपल्याला सोडुन जात असतांना सामाजिक कर्तव्य म्हणुन कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्यास अग्निसंस्कार करण्याच काम करत आहे- तुषार शिंदे, नगरपंचायत कर्मचारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com