esakal | दौरा फडणवीसांचा, बैठका भुजबळांच्या! राजकीय कुरघोडीत कोरोना मात्र दुय्यम

बोलून बातमी शोधा

chhagan bhujbal devendra fadnavis
दौरा फडणवीसांचा, बैठका भुजबळांच्या! राजकीय कुरघोडीत कोरोना मात्र दुय्यम
sakal_logo
By
विनोद बेदरकर

नाशिक : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिक दौऱ्यावर असताना पालकमंत्री छगन भुजबळ ब कृषिमंत्री दादा भुसे यांनी शुक्रवारी (ता. ३०) कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे नियोजन केल्याने हा राजकीय कुरघोडीचा विषय चर्चेत होता.

राजकीय कुरघोडीत कोरोना मात्र दुय्यम

विरोधी पक्षनेत्यांच्या दौऱ्याची हवा काढून घेण्यासाठी बैठकीचा फार्स झाल्याचे बोलले जात होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या नाशिक दौऱ्याचे नियोजन आल्यानंतर शुक्रवारी सकाळपासूनच जिल्हा यंत्रणा कामाला लागली. पालकमंत्री भुजबळ यांच्या बैठकीची तयारी होऊन जिल्हा यंत्रणेचे सर्व प्रमुख अधिकरी भुजबळांच्या बैठकीला जातील आणि विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकी व दौऱ्याचा बार फुसका ठरविण्यासाठी दौरा आणि बैठकीची वेळदेखील दुपारी तीनच्या दरम्यान ठेवली गेली. त्यामुळे साहजिकच या कुरघोडीच्या नियोजनाचा परिणाम बघावयास मिळाला.

हेही वाचा: कोरोना काळात 'या' कंपनीत मात्र घसघशीत पगारवाढ!

फडणवीसांच्या दौऱ्यात विभागांचे प्रमुख गैरहजर

फडणवीस यांच्या दौऱ्यात जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलिस आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असे सगळ्या विभागाचे प्रमुख गैरहजर होते. त्यामुळे फडणवीस यांनी थेट विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या दालनात बसून नाशिकच नव्हे, तर उत्तर महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यांची माहिती घेतली. तत्पूर्वी त्यांनी जिल्हा रुग्णालय व बिटको रुग्णालयाला भेट दिली.

हेही वाचा: मृत्यूची माहिती पोलिसांना कळवा; रुग्णालयावरील हल्ले टाळण्यासाठी उपाययोजना

भुजबळांना माहिती नसावी

सत्ताधारी मंत्र्यांच्या कुरघोडीविषयी फडणवीस यांना विचारले असता, त्यांनी या विषयाला महत्त्व न देता मला राजकीय बोलायचे नाही. माझा दौरा गुरुवारीच निश्‍चित झाला होता. भुजबळ यांना याबाबत माहिती नसावी, अशी प्रतिक्रिया देत विषय संपवला.