
कोविड रुग्णालयासाठी महापालिकेने ठरवून दिलेल्या अटी-शर्तींचे समय रुग्णालयाकडून पालन होत नाही. रुग्णालयासाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था नाही. रुग्णांसह नातेवाईक सर्वसाधारण पार्किंगमध्येच वाहने उभी करतात. त्यामुळे संसर्गाचा धोका वाढला आहे.
कोरोनाकाळात रुग्णालयांचा गोरखधंदा सुरु; परवानगी नसताना रुग्णांच्या जीवाशी होतोय खेळ
नाशिक : शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना ऑक्सिजनसह खाटांची कमतरता भासत असली तरी यानिमित्ताने काही बंद पडलेली रुग्णालये पुन्हा सुरू करून कोरोनाकाळात व्यवसाय करण्याचा नवा धंदा शहरात सुरू झाला आहे. यासंदर्भात गंजमाळ येथील रुग्णालयासंदर्भात स्थानिक नागरिकांनी तक्रार केल्यानंतर प्रकार समोर आला. या रुग्णालयात परवानगी नसताना कोविडचे रुग्ण दाखल करून घेतले जात असल्याचा आरोप दुकानदारांनी केला आहे.
गंजमाळ येथील सुपर मार्केट कॉम्प्लेक्समधील पहिला मजला पाच वर्षांपासून बंद आहे. या मजल्यावर १ सप्टेंबरपासून ‘समय’ नावाने हॉस्पिटल सुरू झाले आहे. हे हॉस्पिटल जनरल व अपघाताच्या रुग्णांसाठी असल्याचा बोर्ड लावण्यात आला आहे. परंतु चार-पाच दिवसांपासून या रुग्णालयात कोविडचे रुग्ण दाखल करून घेतले जात आहेत. रुग्णालयाच्या परिसरात कोविड रुग्णांसह त्यांचे नातेवाईक राजरोसपणे वावरत असून, त्यांच्या मुक्तसंचारामुळे या कॉम्प्लेक्समधील अन्य दुकानदार व कामगारांना संसर्ग होण्याची शक्यता आहे. रुग्णालयांकडून कोविड रुग्णांची व्यवस्थित काळजी घेतली जात नाही. हॉस्पिटल व कॉम्प्लेक्समध्ये ये-जा करण्यासाठी एकच प्रवेशद्वार आहे. रुग्णांसाठी वापरण्यात येणाऱ्या बायोवेस्ट कॉम्प्लेक्सच्या परिसरात पडलेले दिसतात.
हेही वाचा > संतापजनक! कोरोनाबाधित महिलेचा सफाई कर्मचाऱ्याकडून विनयभंग; घटनेनंतर रुग्णालयात खळबळ
संसर्गाचा धोका वाढला
कोविड रुग्णालयासाठी महापालिकेने ठरवून दिलेल्या अटी-शर्तींचे समय रुग्णालयाकडून पालन होत नाही. रुग्णालयासाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था नाही. रुग्णांसह नातेवाईक सर्वसाधारण पार्किंगमध्येच वाहने उभी करतात. त्यामुळे संसर्गाचा धोका वाढला आहे. समय हॉस्पिटलची पाहणी करून ते बंद करावे, अशी मागणी स्थानिक व्यापाऱ्यांनी महापालिका आयुक्त कैलास जाधव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. जानकी फर्निचर, गुरुनानक ऑटो हाउस, सोनी अर्थमूव्हर्स, जैन फर्निचर, गॅलक्सी या दुकानदारांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.
हेही वाचा > ह्रदयद्रावक! मोबाईल मिळेना म्हणून भितीपोटी विद्यार्थीनीची आत्महत्या; ऑनलाइन शिक्षणाचा आणखी एक बळी
संपादन - रोहित कणसे
Web Title: Corona Patients Are Being Treated Hospital Without Permission
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..