esakal | जिल्‍ह्यातील आणखी २१४ कोरोनाबळींची पोर्टलवर नोंद
sakal

बोलून बातमी शोधा

corona death

कोरोना बळींच्‍या संख्येचे भीषण वास्‍तव हळूहळू पुढे येऊ लागले आहे. रुग्‍णालयांकडून पोर्टलवर माहिती अपलोड करण्याची प्रक्रिया सातत्‍याने सुरू आहे. या पार्श्वभूमीवर यापूर्वी झालेल्‍या जिल्‍ह्यातील २६० मृतांच्‍या नोंदी गुरुवारी (ता.१०) पोर्टलवर करण्यात आल्‍या होत्‍या.

जिल्‍ह्यातील आणखी २१४ कोरोनाबळींची पोर्टलवर नोंद

sakal_logo
By
अरुण मलानी

नाशिक : उपचारादरम्‍यान मृत्‍यू झालेल्‍या कोरोनाबाधितांची (Corona Positive) माहिती शासकीय पोर्टलवर अपलोड करण्याची प्रक्रिया अद्याप सुरूच आहे. शुक्रवारी (ता.११) अशा २१४ मृतांच्‍या नोंदी पोर्टलवर झाल्‍या, तर दिवसभरात १६० पॉझिटिव्‍ह आढळले. १६२ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वी मात केली. १९ बाधितांचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला. सद्यःस्‍थितीत जिल्‍ह्यात चार हजार ५९३ बाधितांवर उपचार सुरू आहेत. (another 214 corona patients death registered on the portal in nashik)

कोरोनाबळींच्‍या संख्येचे भीषण वास्‍तव हळूहळू पुढे येऊ लागले आहे. रुग्‍णालयांकडून पोर्टलवर माहिती अपलोड करण्याची प्रक्रिया सातत्‍याने सुरू आहे. या पार्श्वभूमीवर यापूर्वी झालेल्‍या जिल्‍ह्यातील २६० मृतांच्‍या नोंदी गुरुवारी (ता.१०) पोर्टलवर करण्यात आल्‍या होत्‍या. शुक्रवारी आणखी २१४ मृतांच्‍या नोंदी झाल्‍या आहेत. यात नाशिक महापालिका क्षेत्रातील १२७, नाशिक ग्रामीणमधील ७८, मालेगाव महापालिका क्षेत्रातील एक, तर जिल्‍हाबाहेरील आठ मृतांचा समावेश आहे. दरम्‍यान, शुक्रवारी नाशिक महापालिका क्षेत्रातील ८५, नाशिक ग्रामीणमधील ६६, मालेगावच्‍या आठ, तर जिल्‍हाबाहेरील एक बाधिताचा अहवाल पॉझिटिव्‍ह आला. जिल्‍ह्यातील एकूण १९ मृतांमध्ये नाशिक शहरातील १३, ग्रामीणमधील पाच, तर जिल्‍हाबाहेरील एकाचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला.

हेही वाचा: नाशिकमध्ये आता दुसरा 'मॅग्नेट मॅन'! बघण्यासाठी गर्दी

सायंकाळी उशिरापर्यंत एक हजार सहा रुग्‍णांना अहवालाची प्रतीक्षा होती. यात नाशिक ग्रामीणमधील ३५७, नाशिक शहरातील २९६, मालेगावच्‍या ३५३ रुग्‍णांना अहवालाची प्रतीक्षा होती. जिल्‍हाभरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात ६५६ संशयित दाखल झाले. यात नाशिक महापालिका क्षेत्रातील ५९७ रुग्‍णांचा समावेश आहे. जिल्‍हा रुग्‍णालय व डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात प्रत्‍येकी दोन रुग्‍ण दाखल झाले. नाशिक ग्रामीणमध्ये ३५, तर मालेगाव क्षेत्रातील २० रुग्‍णांचा यात समावेश आहे.

(another 214 Corona patients death registered on the portal in nashik)

हेही वाचा: नाशिक शहरात सर्वच भागात गर्दी, जागोजागी वाहतुकीची कोंडी