
नाशिककरांची लसीकरणाकडे नागरिकांची पाठ
नाशिक : कोरोना (Corona) प्रादुर्भाव मंदावल्यानंतर आता लसीकरणाकडे (Vaccination) नागरिकांनी पाठ फिरविली आहे. कोरोना नियंत्रणासाठी महापालिकेने गतीने लसीकरण मोहीम राबविली, मात्र आता नागरिकांनी लस घेण्याकडे पाठ फिरविली आहे. परिणामी लसीकरणाचा वेग थोडा मंदावला आहे.
महापालिकेतर्फे शहरात ३४ लसीकरण केंद्रे
१२ ते १४ वयोगटातील ३९९३७ मुलांना पहिला, तर १३०१९ मुलांना दुसरा, १५ ते १७ वयोगटातील ९०३८३ मुलांना डोस देण्यात आला आहे. त्यात पहिला डोस ५६७६५ मुलांनी पहिला, तर ३१९४२ मुलांनी दुसरा डोस घेतला आहे. १८ वर्षावरील १५ लाख १२ हजार ७६७ लोकांनी डोस घेतला असून, पहिला डोस १३ लाख ८९ हजार ३३० लोकांनी तर दुसरा डोस ११ लाख १२ हजार१३७ लोकांनी घेतला आहे. बूस्टर डोस ५२९५६ लोकांनी घेतला आहे. शहरात दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांचा बूस्टर डोस दिला जात आहे. त्यासाठी शासकीय व खासगी रुग्णालयात लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. शासकीय रुग्णालयात फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना बूस्टर डोस उपलब्ध आहे. शहरातील ४ खासगी रुग्णालयात कोव्हिशिल्ड, तर दोन रूग्णालयात कोव्हिक्सीनचे पैसे देऊन बूस्टर डोस उपलब्ध असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.