esakal | निराशाजनक! कोरोना योध्देच संकटात! वेतन थकल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ
sakal

बोलून बातमी शोधा

corona worriers waiting for salary last 3 months nashik marathi news

नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य विभागातील 621 शिर्षकाखाली वेतन घेणार्या कर्मचार्याची गेली वर्षभरापासुन वेतनात दिरंगाई सुरू आहे.चार-चार महिन्याचे वेतन थकल्यान नंतर एखाद्या महिन्याचे वेतन दिले जात आहे.

निराशाजनक! कोरोना योध्देच संकटात! वेतन थकल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ

sakal_logo
By
दीपक अहिरे

नाशिक/पिंपळगावं बसवंत : गेल्या चार महिन्यापासुन आरोग्य कर्मचारी कोरोना पासुन नागरिकांचा बचाव करण्यासाठी जीवाची बाजी लावुन काम करीत आहेत.पण याच कर्मचाऱ्यांचे तीन-चार महिन्याचे वेतन थकल्याने कोरोना योध्द्यांवर उपासमारीचे वेळ आली आहे. कुटुंब उदरनिर्वाहा बरोबरच कर्जाचे हप्ते थकल्याने आरोग्य कर्मचारी विवंचनेत आहेत.

नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य विभागातील 621 शिर्षकाखाली वेतन घेणार्या कर्मचार्याची गेली वर्षभरापासुन वेतनात दिरंगाई सुरू आहे.चार-चार महिन्याचे वेतन थकल्यान नंतर एखाद्या महिन्याचे वेतन दिले जात आहे.कोरोनाच्या महामारीत दिवसरात्र काम करणारे आरोग्य कर्मचारी हक्काच्या वेतनाची महीनोमहीने प्रतिक्षा करीत आहे.वारंवार मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

हेही वाचा > भरचौकात 'त्याने' थेट वाहतूक पोलिसाच्याच श्रीमुखात भडकावली...नेमके काय घडले?

उसणवारी करून दिवस काढण्याचे वेळ

वेतना अभावी आरोग्य कर्मचार्याची आर्थिक कोंडी झाली आहे.दैनदिन खर्चा बरोबरच कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे जिकरीचे बनले आहे. इतरांकडुन उसणवारी करून दिवस काढण्याचे वेळ आरोग्य कर्मचार्यावर आली आहे. त्यातच बॅकाकडुन घर व वाहनासाठी घेतलेले कर्जाचे हप्ते फेडले जात नाही.त्यामुळे बॅकेचे वसुली अधिकार्याचा तगादा सुरू आहे.आरोग्य सेवा देऊनही वेतन मिळत नसल्याने त्या कर्मचार्याचा संयम संपला आहे.
तात्काळ वेतन द्यावे,अशा मागणीचे निवदेन निफाड पंचायत समिती अंतर्गत आरोग्य कर्मचार्यानी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर,गटविकास अधिकारी संदीप कराड,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.चेतन काळे यांना दिले आहे.यावेळी आरोग्य सेवक संतोष खालकर,मनोज पाटील,मयुर पवार,अविनाश चौधरी,संजय भांड,केणे,सुरज हरगुडे प्रशांत चौधरी,दवंग आदी उपस्थित होते.

कोरोनाच्या संकटात काम करूनही हक्काचे वेतन मिळत नाही.वर्षभरापासुन आर्थिक पिळवणुक सुरू आहे.तात्काळ वेतन न झाल्यास आत्महदनाचा इशारा दिला आहे. -संतोष खालकर (आरोग्य सेवक,नांदुर्डी).

हेही वाचा > पहाटेची वेळ...मंदिरात आश्रयाला थांबलेले गुराखी दुर्गंधीने अस्वस्थ; शोध घेताच बसला धक्का

संकटकाळात कर्तव्य बजावणार्या आरोग्य कर्मचार्याची वेतन अभावी हेळसांड दुर्देवी आहे.621 शिर्षकाला निधी प्राप्त का होत नाही,या बाबत प्रशासनाला विचारणा करणार आहे.लवकरच हा प्रश्‍न सोडवु. -बाळासाहेब क्षीरसागर(अध्यक्ष,जिल्हा परिषद,नाशिक).

संपादन - रोहित कणसे
 

loading image
go to top