esakal | #Coronaeffect : शिर्डीतील रामनवमीच्या उत्साहावर यंदा कोरोनाचे सावट..साईभक्तांचा महापूर ओसरणार!
sakal

बोलून बातमी शोधा

shirdi sai 123.jpg

हजारो साईभक्त पायी दिंड्यांद्वारे शिर्डीला येत असतात अनेक दिंड्यांमध्ये हजारो साईभक्त असतात.त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्यासाठी हजारो साईभक्त एकत्र येऊ नये यासाठी पायी दिंड्या न काढण्याचा निर्णय अनेक मंडळांनी घेतला आहे.त्यामुळे यंदा शिर्डी मार्गावर पायी साईभक्तांचा येणारा महापूर ओसरणार असल्याचे दिसते.

#Coronaeffect : शिर्डीतील रामनवमीच्या उत्साहावर यंदा कोरोनाचे सावट..साईभक्तांचा महापूर ओसरणार!

sakal_logo
By
विजय पगारे : सकाळ वृत्तसेवा

नाशिक / इगतपुरी : समस्त मुंबईकरांचे आराध्य दैवत व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे देवस्थान असलेल्या शिर्डी येथील रामनवमी उत्साहावर यंदा कोरोनाचे सावट मोठ्या प्रमाणात वाढले आहे.मुंबईच्या उपनगरांसह राज्य व शेजारील राज्यांतील विविध भागातुन रामनवमीच्या ( ता. 2 एप्रिल ) मुहूर्तावर शिर्डीकडे येणा-या शेकडो पालख्या व पायी दिंड्या येणार नसल्याने त्याचा परिणाम महामार्गावरील व्यवसायांवरही होणार आहे.दरम्यान,शिर्डी येथील साईमंदिर दर्शनासाठी बंद असल्याने मुंबई आग्रा महामार्गासह घोटी - सिन्नर-शिर्डी महामार्गावर एकदमच शुकशुकाट पसरला आहे.

शेकडो पालख्या व पायी दिंड्या निघणार नसल्याने व्यावसायिकांचे नुकसान
शिर्डी येथे वर्षभरात मोजकेच उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात.त्यात गुरुपौर्णिमा आणि रामनवमी उत्सव सर्वात मोठ्या प्रमाणात व भक्तिभावाने साजरा केला जातो.या उत्सवासाठी विविध भागांसह मुंबईसह उपनगरातून शेकडो पालख्या व पायी साईभक्त येत असतात.मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिर्डी येथील साई मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे त्यामुळे रामनवमीच्या मुहूर्तावर मुंबईतून निघणा-या पायी दिंड्या त्यामुळे निघालेल्या नाहीत. दरम्यान शिर्डी संस्थाननेही पायी दिंडी आयोजकांना कोरोनाबाबत काळजी घेण्याचे कळविल्याने अनेकांनी पायी दिंड्यातील गर्दी टाळण्यासाठी सामाजिक भावनेतून दिंड्या न काढण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.

साईभक्तांचा येणारा महापूर ओसरणार

शेजारील गुजरात राज्यासह मुंबई,पनवेल,कल्याण,डोंबिवली,उल्हासनगर, ठाणे,दादर,सायन,माटुंगा,वसई,गोरेगाव,मालाड,जोगेश्वरी,विलेपार्ले,बोरवली,अंधेरी,कांदीवली,डहाणु कसारा,शहापुर,मुरबाड,इगतपुरी,नााशिक,घोटी येथून हजारो साईभक्त पायी दिंड्यांद्वारे शिर्डीला येत असतात अनेक दिंड्यांमध्ये हजारो साईभक्त असतात.त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्यासाठी हजारो साईभक्त एकत्र येऊ नये यासाठी पायी दिंड्या न काढण्याचा निर्णय अनेक मंडळांनी घेतला आहे.त्यामुळे यंदा शिर्डी मार्गावर पायी साईभक्तांचा येणारा महापूर ओसरणार असल्याचे दिसते.

हेही वाचा > #Lockdown : ...अन् अडकलेल्या 'त्या' गर्भवतीच्या मदतीला 'ते' देवदूतासारखे धावून आले!

25 - 30 वर्षांपासून येणा-या या दिंडीत खंड

दादर,परळ,वरळी,सायन,कल्याण,ठाणे,विरार,नालासोपारा,नायगाव,पनवेल ठाणे येथील साईसेवक या पायी दिंडीत दरवर्षी 5 ते 10 हजार भाविक पायी दिंडीद्वारे शिर्डीला येत असतात.या पैकी काही दिंड्यांचे रौप्यमहोत्सवी वर्ष झाले असून यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या पायी दिंडीवर सावट ओढावले आहे.त्यामुळे सुमारे सलग 25 - 30 वर्षांपासून येणा-या या दिंडीत खंड पडण्याची शक्यता आहे.

हेही वाचा > ह्रदयद्रावक! 'ते' दोघं मज्जाक - मस्ती करत घराकडे निघाले...मात्र, वाटेत काळाने अडवलं 

loading image