भाऊ! इथे चाराण्याची कोंबडी अन्‌ बाराण्याचा मसाला झालाय...

poultry (1).jpg
poultry (1).jpg

नाशिक/ पिंपळगाव बसवंत : "चाराण्याची कोंबडी आणि बाराण्याचा मसाला' अशा आशयाची म्हण आहे आणि ही म्हण शब्दशः कोंबडीच्या स्वस्त दरामुळे प्रत्यक्षात उतरली आहे. निफाड तालुक्‍यात चिकनचे दर आता 60 ते 70 रुपये किलोपर्यंत खाली घसरले आहेत. 70 रुपयांचे एक किलो चिकन बनविण्यासाठी नारळ, तेल, सुके खोबरे, तीळ, खसखस, कांदा, आले, लसूण, कोथिंबीर, हळद, चटणी आणि गरम मसाला याचा खर्च 150 रुपयांच्या आसपास आहे. त्यामुळे "चाराण्याची कोंबडी आणि...', ही म्हण अनुभवण्याची वेळ आली आहे. 

"कोरोना'चा परिणाम; चिकनच्या दरात घसरण 
अर्थात चीनमधील कोरोना या संसर्ग आजाराचा आणि चिकनचा संदर्भ जोडला गेल्याने चिकन विक्रीवर मोठा परिणाम झाला आहे. चिकनचे दर दुकानागणिक बदलले आहेत. चिकन स्वस्त दरात मिळू लागले आहे. कोरोना आणि चिकन याचा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही, हे सांगून चिकन विक्रेते थकले आहेत, पण तूर्त तरी चिकनपेक्षा कोरोनाचाच प्रभाव लोकांच्या मनात अधिक झाला आहे. निफाड तालुक्‍यात मटणाचे दर 500 ते 520 रुपये किलो आहेत, पण हळूहळू हे दर वाढण्याची भीती आहे. मटणाच्या दरामुळे चिकन खाणाऱ्यांची संख्या काही ठिकाणी टिकून आहे. चांगले चिकन 180 ते 200 रुपयांपर्यंत विकणारी दुकानेही आहेत. मात्र, कोरोनामुळे सारे मुसळ केरात गेले आहेत. ग्राहक नसल्याने विक्रेत्यांवर अक्षरश: माश्‍या हुसकावण्याची वेळ आली आहे. चिकन पार्सलची भीती घालविण्यासाठी नाशिक येथे चिकन फेस्टिव्हलचे आयोजन करावे लागले. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com