Nashik Crime News : टोळक्याकडून दांपत्याला मारहाण; परस्परविरोधी गुन्हे दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

beating

Nashik Crime News : टोळक्याकडून दांपत्याला मारहाण; परस्परविरोधी गुन्हे दाखल

नाशिक : वडाळागावातील मदिनानगरमध्ये दांपत्याला (Couple) संशयित टोळक्याने बेदम मारहाण केल्याची घटना घडली.

या प्रकरणी इंदिरानगर पोलिसात परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. (Couple beaten up by gang Conflicting cases filed with Indiranagar police nashik news)

शिरीन इसाक शेख (रा. सादिकनगर, वडाळागाव) यांच्या फिर्यादीनुसार, आवेश कोकणी, गुलाम कोकणी, नूर कोकणी, व अन्य दोघांविरोधात (सर्व रा. कोकणीपुरा, भद्रकाली) गुन्हा दाखल करण्यात आला. शेख यांचा मदिनानगरमध्ये प्लॉट आहे.

या प्लॉटमधून गोठ्याची ड्रेनेज लाइन गेलेली आहे. रविवारी (ता.१२) शेख दांपत्य हे प्लॉटच्या ठिकाणी गेले असता, त्याठिकाणी संशयित होते. शेख यांचे पतीने त्यांना ड्रेनेज लाइन काढून घेण्यास सांगितले असता, संशयितांनी शिवीगाळ करीत त्यांना मारहाण केली.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

पती वाचविण्यासाठी गेल्या असता त्यांनाही मारहाण करण्यात आली. आसपासच्या लोकांनी शेख यांच्या पतीला वाचविण्यासाठी घरात लपविले. त्यानंतर उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी इंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर, गुलामगौस कोकणी (रा. कोकणीपुरा) यांच्या फिर्यादीनुसार, इसाक शेख, मोईन शेख, फरीद शेख (सर्व रा. वडाळागाव) यांच्याविरोधात इंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादीनुसार, संशयित इसाक शेख याने आमच्या प्लॉटमधून ड्रेनेज लाइन काढून घ्या अशी कुरापत काढून धक्काबुक्की करीत लाकडी दांड्याने मारले. या प्रकरणात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले.