esakal | काय मद्यविक्रेत्यांनो? वारंवार सांगूनही नाही ना पाळले..आता भोगा!
sakal

बोलून बातमी शोधा

wine rang.jpg

शासनाच्या आदेशानुसार राज्यभरात मद्यविक्रीस प्रतिबंधित क्षेत्र वगळता सोमवारपासून (ता.4) सशर्त परवानगी देण्यात आली. त्यानुसार जिल्हा प्रशासन, पोलिस, राज्य उत्पादन शुल्क विभागाने बैठक घेत कोणती खबरदारी घ्यायची याबद्दल नियोजनही केले होते. तसेच त्यासंदर्भातील मद्यविक्रेत्यांना पूर्व-कल्पनाही देण्यात आल्या होत्या. पण तरीदेखील...

काय मद्यविक्रेत्यांनो? वारंवार सांगूनही नाही ना पाळले..आता भोगा!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शासनाच्या आदेशानुसार राज्यभरात मद्यविक्रीस प्रतिबंधित क्षेत्र वगळता सोमवारपासून (ता.4) सशर्त परवानगी देण्यात आली. त्यानुसार जिल्हा प्रशासन, पोलिस, राज्य उत्पादन शुल्क विभागाने बैठक घेत कोणती खबरदारी घ्यायची याबद्दल नियोजनही केले होते. तसेच त्यासंदर्भातील मद्यविक्रेत्यांना पूर्व-कल्पनाही देण्यात आल्या होत्या. पण तरीदेखील...
 

अगोदरच सुचना दिल्या होत्या तरीपण...
शासनाच्या आदेशानुसार राज्यभरात मद्यविक्रीस प्रतिबंधित क्षेत्र वगळता सोमवारपासून (ता. 4) सशर्त परवानगी देण्यात आली. त्यानुसार जिल्हा प्रशासन, पोलिस, राज्य उत्पादन शुल्क विभागाने बैठक घेत कोणती खबरदारी घ्यायची याबद्दल नियोजनही केले होते. तसेच त्यासंदर्भातील मद्यविक्रेत्यांना पूर्व-कल्पनाही देण्यात आल्या होत्या. त्यानुसार, दोन ग्राहकांमध्ये किमान 6 फुट अंतर, दुकानात येणाऱ्या कर्मचारी, ग्राहकांची थर्मल स्कॅनिंगमार्फत चाचणी बंधनकारक केली होती. ज्यांना ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे असतील, त्यांना दुकानात येण्यास प्रतिबंध करण्यात आला होता. 

अन दिले बंदचे आदेश 
सोमवारी (ता. 4) सकाळपासून मद्यपींनी मद्यविक्री दुकानांबाहेर गर्दी गेली होती. ही दुकाने दुपारी दोन वाजेनंतर सुरू झाली. त्यामुळे दुकानांबाहेर मद्यग्राहकांची तोबा गर्दी झाली होती. परंतु, ग्राहकांनी वा मद्य-विक्रेत्यांनी ठरवून दिलेल्या नियमांकडे दुर्लक्ष केले. शहर पोलिसांनी सुरवातीस ग्राहकांना समजावून सांगण्याचा प्रयत्नही केला. तसेच काही ठिकाणी सौम्य लाठीमारही करावा लागला. तरीही नियमांचे पालन करून मद्याची विक्री होत नसल्याने अखेर सायंकाळी चारनंतर सर्व मद्यविक्रीचे दुकाने बंद करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच नियमांचे पालन न केल्याप्रकरणी पोलिस आयुक्तालय हद्दीतील 56 मद्यविक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्यता आले आहेत. आयुक्तालय हद्दीत सर्वाधिक गुन्हे नाशिकरोड, अंबड, पंचवटी व गंगापूर पोलिस ठाण्यांतर्गत दाखल झालेले आहेत. 

* पोलीस ठाणेनिहाय दाखल गुन्हे (कंसात गुन्ह्यांची संख्या) : 
आडगाव (3), म्हसरुळ (1), पंचवटी (8), भद्रकाली (4), सरकारवाडा (4), गंगापूर (5), मुंबईनाका (3), अंबड (7), इंदिरानगर (3), सातपूर (2), उपनगर (5), नाशिकरोड (9), देवळाली कॅम्प (2) 

हेही वाचा > "चहापाणी घ्या पण आम्हाला जाऊ द्या साहेब! कारमधील चौघांनी दाखवले पोलीसांना आमिष..अन् झाला मोठा खुलासा

शहरातील 56 मद्यविक्रेत्यांवर गुन्हे : नाशिकरोड, अंबड, पंचवटीत सर्वाधित गुन्हे 

कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी संचारबंदी-जमावबंदीचा आदेश लागू होता. तर, शासनाच्याच आदेशाने मद्यविक्रीला परवानगी दिली. मात्र मद्यविक्रेत्यांनी सोशल डिस्टसींग वा थर्मल स्कॅनिंग न करताच विक्री सुरू केली. त्यामुळे उडालेल्या झुंबडीमुळे आयुक्तालय हद्दीतील 56 मद्यविक्रेत्यांविरोधात नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

हेही वाचा > पोल्ट्री फार्मवर सकाळी गेलेला युवक रात्री परतलाच नाही..भावाने फार्मच्या फटीतून पाहिले तर धक्काच!

loading image