Nashik News : आदिवासी विभागातील ‘त्या’ वाढदिवसाला ठेकेदारांची भाऊगर्दी

नाशिक अप्पर आयुक्त कार्यालयातील उपायुक्तांचा कार्यालयात धुमधडाक्यात साजऱ्या झालेल्या वाढदिवसाला कर्मचाऱ्यांसोबतच ठेकेदारांनी मोठी गर्दी केल्याचे समोर आले आहे.
crowd at contractors on that birthday in tribal department nashik
crowd at contractors on that birthday in tribal department nashik esakal

Nashik News : आदिवासी विभागांतर्गत येणाऱ्या नाशिक अप्पर आयुक्त कार्यालयातील उपायुक्तांचा कार्यालयात धुमधडाक्यात साजऱ्या झालेल्या वाढदिवसाला कर्मचाऱ्यांसोबतच ठेकेदारांनी मोठी गर्दी केल्याचे समोर आले आहे.

आश्रमशाळांमध्ये केळी, अंडी, दूध तसेच सराव प्रश्नसंच पुरवठ्यासाठी इच्छुक ठेकेदारांनी या वाढदिवसाला हजेरीच नाहीतर हातभारही लावल्याची चर्चा आदिवासी विभागात दबक्या आवाजात सुरू आहे. (crowd at contractors on that birthday in tribal department nashik news )

बुधवारी आदिवासी विकास विभागात नाशिक अप्पर आयुक्तालयात उपायुक्त पदावर कार्यरत उपायुक्त नगरे यांचा धुमधडाक्यात झालेला वाढदिवस चांगलाच चर्चेत आला आहे. एखाद्या सेलिब्रिटीप्रमाणे वाढदिवस साजरा झाला. नगरे यांच्या वाढदिवसासाठी कार्यालय फुलांनी सजले होते. स्वागतासाठी रांगोळ्या काढल्या होत्या.

तसेच कोल्ड फायर लावून त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. धुमधडाक्यात झालेल्या या वाढदिवसाची आदिवासी आयुक्त नयना गुंडे यांनी गंभीर दखल घेत नगरेंसह विभागातील ४२ कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. असे असतानाच आता या वाढदिवसातील अनेक किस्से समोर येऊ लागले आहेत.

crowd at contractors on that birthday in tribal department nashik
Nashik News : नाशिकमध्ये विविध ठिकाणी गुंडाविरोधी पथकाकडून कोम्बिंग ऑपरेशन!

नगरे यांना शुभेच्छा देण्यासाठी काही ठेकेदारांनी साहेबांना महागडी गिफ्ट दिल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे विभागाने अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई केली असली तरी, या कार्यक्रमाला हजेरी लावणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई का नाही, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

खुलाशाची मुदत आज संपणार

नगरेंचा वाढदिवस धुमधडाक्यात झाल्यानंतर समर्थकांनी या प्रकारामुळे कार्यालयीन शिस्तीचा भंग झाल्याचे लक्षात आल्यानंतर आणि आयुक्तांच्या आदेशानंतर अप्पर आयुक्त संदीप गोलाईत यांनी नगरेंसह कार्यालयीन अधिक्षक राजेंद्र महाले यांच्यासह वाढदिवसात सहभागी झालेल्या ४२ जणांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

या सर्वांना खुलाशासाठी दिलेली तीन दिवसांची मुदत शनिवारी (ता.२०) संपत आहे. त्यामुळे नगरेंसह कर्मचारी काय खुलासा करतात याकडे लक्ष आहे.

crowd at contractors on that birthday in tribal department nashik
Nashik News : बाजार समितीच्या उत्पन्नात 4 पटीने वाढ : सभापती विनोद चव्हाण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com