esakal | तलवारीने केक कापणे पडले महागात; बर्थडे बॉय बाराच्या भावात!
sakal

बोलून बातमी शोधा

birthday

तलवारीने केक कापणे पडले महागात; बर्थडे बॉयवर गुन्हा

sakal_logo
By
प्रशांत बैरागी

नामपूर (जि.नाशिक) : दरेगाव (ता. बागलाण) येथे तलवारीने केक कापत वाढदिवस साजरा केल्याप्रकरणी जायखेडा पोलिसांत बर्थडे बॉयवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काय घडले नेमके? (cutting-cake-with-sword-Crime-filed-against-Birthday-Boy-jpd93)

तलवारीने केक कापणे पडले महागात

महेश दयाराम पवार (वय २०, रा. दरेगाव) याने गुरुवारी (ता. १५) आपल्या गावात स्वतःचा वाढदिवस तलवारीने केक कापून साजरा केला. याबाबतची गोपनीय माहिती जायखेड्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांना मिळाली असता, त्यांनी पोलिस उपनिरीक्षक मिलिंद नवगिरे व त्यांच्या पथकास याबाबत चौकशी करण्यास सांगितले. नवगिरे यांनी पवार याचे दरेगाव येथील घर गाठत चौकशी केली असता, गावातच गर्दी जमवत प्रदर्शन करत तलवारीने केक कापल्याचे तपासातून निष्पन्न झाले. ज्या तलवारीने केक कापला होता ती तलवार पोलिसांनी पवार यांच्या घरातून ताब्यात घेतली आहे. याबाबत पोलिस शिपाई सुनीलसिंग बावरी यांनी जायखेडा पोलिसांत फिर्याद देत बर्थडे बॉय महेश पवार याच्यावर विनापरवाना तलवार बाळगून जिल्हाधिकारी यांचे जमावबंदी व शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केले, वाढदिवस साजरा करताना लोकांची गर्दी जमवून कोरोनाच्या नियमांचे व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करून कोरोना संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव पसरेल असे कृत्य केल्याने विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक भोये तपास करत आहेत.

हेही वाचा: नाशिक रोडला भाजपमध्ये फूट; सानप समर्थक आमदारांची दांडी

हेही वाचा: नाशिकमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची ऑगस्टमध्ये तयारी

loading image