Cyber Crime
sakal
आंतरराष्ट्रीय पातळीवरील बँकेत उच्चपदस्थ पदावर असलेली महिला सोशल मीडियाच्या माध्यमातून एका युरोपियन डॉक्टरच्या प्रेमात पडली. प्रेमाखातर सातसमुद्रा पलीकडून तिला ‘गिफ्ट’ पाठविले. आणखी महागडे ‘गिफ्ट’ पाठविले असता, ते कस्टममध्ये अडकले. ते सोडविण्यासाठी तो स्वतः आला अन् तोही अडकला. त्याला या कचाट्यातून सोडविण्याठी तब्बल चार- साडेचार कोटी गमावल्यानंतर तिला फसवणूक झाल्याची उपरती झाली. या गुन्ह्याचा तपास करताना तत्कालीन पुणे सायबर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अंकुश चिंतामण यांनी खुबीने उकल केली अन् तिघा परदेशी संशयितांना बेड्या ठोकल्या.