Nashik News: नाशिकचे सायकलस्वार जगदंबेच्या दर्शनाला! 270 सायकलस्वारांत 10 वर्षांची चिमुरडी

Yevlekar welcoming the members of Nashik Cyclist Association at Vinchur Chauphuli.
Yevlekar welcoming the members of Nashik Cyclist Association at Vinchur Chauphuli.esakal

येवला : नाशिक सायकलिस्ट असोसिएशनच्या सायकलस्वारांनी रविवारी (ता. २२) नाशिक ते येवला तालुक्यातील कोटमगाव असा सायकल रॅलीद्वारे प्रवास करीत त्यांनी श्री क्षेत्र कोटमगावच्या आई जगदंबेचे दर्शन घेतले.

वारीमध्ये महिलासह दहा वर्षांची चिमुरडी नाशिक येथून सायकल चालवत येवल्यात दाखल झाले. सायकल रॅली सर्वांचे लक्ष वेधून गेली. अंमली पदार्थमुक्तीचा संदेश या कार्यकर्त्यांनी दिला. (Cyclists of Nashik visit Jagdamba 10 year old girl among 270 cyclists Nashik News)

‘सायकल चालवा, निरोगी राहा’ यांसह ‘पर्यावरण वाचवा, प्रदूषण टाळा’, तसेच अंमली पदार्थमुक्तीचा संदेश जनमाणसात पोहोचविण्यासाठी नवरात्रोत्सवानिमित्त अनेक चांगल्या कार्याचा पायंडा पडतो.

त्यापैकी एक म्हणजे नाशिक जिल्ह्यात येवला ते कोटमगावातील जगदंबामातेपर्यंत सायकलपटूंनी काढलेली रॅली. नाशिकचे सायकलस्वार गेल्या दहा वर्षांपासून अव्हातपणे ते देवी दर्शनाला येतात. नाशिकसह परिसरातील २०० पेक्षा जास्त सायकलपटू या राइडमध्ये सहभागी झाले.

त्यात महिला होत्या. यंदाचे अकरावे वर्ष असून, सुमारे १०० किलोमीटर सायकलने प्रवास करत सकाळी अकराला वारीचे स्वागत येवलेकरांनी विंचूर चौफुलीवर केले.

सिन्नर व नाशिक येथे या महिन्यात ड्रगचा साठा सापडला असून, तरुण पिढी या अंमली पदार्थाच्या आहारी गेल्याचे निष्पन्न झाले आहे. हाच धागा पकडत यंदाच्या सायकालिस्ट असोसिएशनच्या सभासदांनी अंमली पदार्थविरोधी मोहीम सुरू केली आहे.

Yevlekar welcoming the members of Nashik Cyclist Association at Vinchur Chauphuli.
Navratri 2023 : आई अंबाबाईच्या मंदिरातील खांब मोजताच येत नाहीत, हे खरंय का?

तरुणांनी अमली पदार्थांपासून दूर राहावे, असे आवाहन असोसिएशनने केले. सायकल चालविल्याने पर्यावरण सुरक्षित राहून आपले आरोग्यही चांगले राहते, अशी माहिती या सायकलस्वारांनी दिली.

विंचूर चौफुलीवर तेजतारा फाउंडेशनने सायकलिस्ट असोसिएशनच्या सदस्यांचा सन्मान केला. नंतर ही वारी कोटमगावच्या दिशेने रवाना झाली.

नाशिक सायकलिस्ट असोसिएशनच्या उपाध्यक्ष मनीषा रौंदळ, ज्येष्ठ नेते किशोर सोनावणे, तेजतारा फाउंडेशनच्या अध्यक्षा तेजस्विनी लासुरे, रितेश बूब, अतुल घटे आदी उपस्थित होते. कोटमगाव येथे जगदंबा ट्रस्टतर्फे सायकलवीरांचा सत्कार करण्यात आला.

Yevlekar welcoming the members of Nashik Cyclist Association at Vinchur Chauphuli.
Navratri 2023: ‘आग्या हो विसरग्या हो’चा गावागावांत गजर! शारदीय नवरात्रोत्सवातील अष्टमीनिमित्त चक्रपूजा

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com