Nashik | गॅस गळतीमुळे सिलेंडरचा स्फोट; संसार उपयोगी वस्तू खाक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gas explosion

Nashik | गॅस गळतीमुळे सिलेंडरचा स्फोट; संसार उपयोगी वस्तू खाक

म्हसरूळ (नाशिक) : मेरी रासबिहारी लिंक रोड वरील माने नगर येथे गुरूवारी (ता.१६) दुपारी गॅस गळतीमुळे (Gas leak) सिलेंडरचा स्फोट (Cylinder explosion) झाला. यात संसार उपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. सुदैवाने जीवित हानी झाली नाही. या प्रकरणी म्हसरूळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

याबाबत अधिक माहिती अशी की, मेरी रासबिहारी लिंक रोडवर माने नगर येथे विठ्ठल गुणाजी बोरकर हे त्यांच्या मावस बहिणीच्या जागेत पत्र्याच्या शेडमध्ये राहत होते. बोरकर यांचा टेलरिंगचा व्यवसाय आहे. गुरूवारी (ता.१६) दुपारी दोन अडीच वाजेच्या सुमारास सिलेंडर गॅसचा स्फोट झाला. सदर स्फोट गॅस गळतीमुळे झाल्याच प्रथम दर्शनी आढळून आले. यात संसार उपयोगी जळून खाक झाल्या आहे.

हेही वाचा: ओमिक्रॉनची धास्ती! नाशिकमध्ये 23 तारखेपासून नियम होणार आणखी कडक

सदरचा स्फोट झाल्याची घटना आजू बाजूच्या नागरिकांनी प्रभागातील नगरसेविका प्रियंका माने व धनंजय उर्फ पप्पू माने यांनी कळविले. तात्काळ घटनस्थळी धाव घेतली. आजू बाजूला असलेल्या नागरिकांना दूर पाठविले. आग विझवण्यासाठी उपस्थितांनी प्रयत्न केले.

हेही वाचा: आदिवासी नृत्यावर पोलिस आयुक्तांनी धरला ‘ठेका’!

Web Title: Cylinder Explosion Due To Gas Leak In Nashik

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Nashikgas explosion