esakal | प्रभावी कृषी विस्तारासाठी शेतकऱ्यांची ‘रिसोर्स बँक’; कृषिमंत्र्यांचे मार्गदर्शन लाभणार
sakal

बोलून बातमी शोधा

dada bhuse 1.jpg

या उपक्रमात सहभागी झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांशी कृषिमंत्री दादा भुसे हे सोमवारी (ता. १९) सकाळी अकराला ऑनलाइन संवाद साधतील. हा संवाद निमज (ता. संगमनेर) येथील शेतकरी तुकाराम गुंजाळ यांच्या शेतातून होईल. 

प्रभावी कृषी विस्तारासाठी शेतकऱ्यांची ‘रिसोर्स बँक’; कृषिमंत्र्यांचे मार्गदर्शन लाभणार

sakal_logo
By
महेंद्र महाजन

नाशिक : कृषी विभागाची स्वतःची विस्ताराची व्यवस्था आहे. त्यापलीकडे प्रत्यक्ष प्रयोगशील यशस्वी शेतकऱ्यांकडून इतरांना मार्गदर्शन मिळावे म्हणून राज्यातील पाच हजार शेतकऱ्यांची ‘रिसोर्स बँक’ तयार करण्यात आली आहे. या उपक्रमात सहभागी झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांशी कृषिमंत्री दादा भुसे हे सोमवारी (ता. १९) सकाळी अकराला ऑनलाइन संवाद साधतील. हा संवाद निमज (ता. संगमनेर) येथील शेतकरी तुकाराम गुंजाळ यांच्या शेतातून होईल. 

२४९ शेतकऱ्यांचा व्हॉट्सॲप समूह तयार

ऑनलाइन संवादावेळी नाशिक, नगर आणि पुणे जिल्ह्यातील जवळपास अडीचशे शेतकरी निमज येथे उपस्थित असतील. रिसोर्स बँकेतील शेतकऱ्यांशी ऑनलाइन संवाद साधण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील २४९ शेतकऱ्यांचा व्हॉट्सॲप समूह तयार करण्यात आला आहे. त्यात सहभागी शेतकऱ्यांची संख्या तालुकानिहाय अशी : नाशिक- दहा, इगतपुरी- १८, पेठ- २०, त्र्यंबकेश्‍वर- नऊ, निफाड- ११, सिन्नर- ३०, चांदवड- दहा, येवला- १२, कळवण- १७, देवळा- १७, दिंडोरी- २४, सुरगाणा- १३, मालेगाव- २१, बागलाण- १२, नांदगाव- २५. निमज येथे संवादासाठी नाशिक, सिन्नर, येवला, निफाड, इगतपुरी तालुक्यांतून ५० शेतकरी जाणार आहेत. 

हेही वाचा > दुर्देवी! मुसळधार पावसात घेतला झाडाचा आसरा; मात्र नियतीने केला घात

चित्रपट प्रीमियरचे फेसबुक लाइव्ह

‘गांडूळ नंबर १’ या चित्रपटाच्या प्रीमियरची सुरवात कृषी सचिव एकनाथ डवले यांच्या हस्ते फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून सोमवारी (ता. १९) सायंकाळी पाचला होईल. http://www.facebook.com/paanifoundation या लिंकवर लाइव्ह उपलब्ध असेल. ही लिंक राज्यातील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक, कृषिमित्र, शेतकरी गटांपर्यंत पाठविण्यात आली आहे.  

हेही वाचा > दारूची नशा भोवली : अगोदरच मद्यधुंद असूनही आणखी दारूची हौस; नशेत केले कांड, चौघे थेट तुरुंगात!

loading image