Unseasonal Rain Damage | राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी : दादाजी भुसे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Minister Dadaji Bhuse while inspecting the vineyard and wheat crop field

Unseasonal Rain Damage | राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी : दादाजी भुसे

चांदोरी (जि. नाशिक) : राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून राज्य सरकार मदतीसदंर्भात गंभीर आहे.

अवकाळीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे देण्यात आले असून शिवसेना सत्तेत असली तरी, मदतीसंदर्भात शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याची ग्वाही पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली आहे. (Dadaji Bhuse statement over Unseasonal Rain crop Damage State Government with Farmers at chandori nashik news)

निफाड तालुक्यात दिनांक सोमवार,मंगळवार ६ व ७ फेब्रुवारी झालेल्या गारपिट आणि अवकाळी पावसाने द्राक्ष,कांदे,गहू यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.शुक्रवार दिनांक १० फेब्रुवारी रोजी या नुकसानग्रस्त भागांना नाशिकचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. सरकार आपल्या पाठीशी असल्याची हमी देत भुसे यांनी नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यासह इतर काही ठिकाणी अवकाळीने सोमवारी दमदार हजेरी लावल्याने द्राक्षबागा,गहू,कांदे नुकसान झाले आहे.नागापूर फाटा येथील नितीन इंगोले यांची द्राक्ष बाग,तसेच छत्रपती संभाजी नगर रोड लगत राजेंद्र घोरपडे व गोराडे यांचा गहू या ठिकाणी पालकमंत्री दादाजी भुसे,जिल्हा कृषी अधिकारी विवेक सोनवणे आदींनी शुक्रवार रोजी भेट दिलो.

हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

नुकसानीची पाहणी केली.मंत्री भुसे यांनी गारपीट व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून त्याचा अहवाल सरकारला सादर करण्याचे आदेश संबंधित विभागांना दिले.

या प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख भाऊलाल तांबडे,अनिल ढिकले,उदय सांगळे,वैद्यकीय मदत कक्षचे अनिकेत कुटे,चांदोरी चे सरपंच विनायक खरात,माजी सरपंच संदीप टर्ले,अनिल वनारसे,संजय शेळके,सचिन गडाख,प्रकाश ढेमसे,मंडलाधिकारी कुंदे आदी उपस्थित होते.