Nashik Water Scarcity : दिंडोरीतील धरणे अद्याप अतृप्तच; जोरदार पावसाअभावी जेमतेम साठा

Depleted water storage in the dam
Depleted water storage in the dam esakal

Nashik Water Scarcity : पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटूनही दिंडोरी तालुक्यातील धरणांमध्ये पुरेसा साठा झालेला नाही.

तालुक्यातील धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या पूर्व भागातील नागरिक व गावांमध्ये चितेचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या पावसाची आवश्यकता असून नागरिक धरणे भरण्याची प्रतीक्षा करीत आहे.

तालुक्यातील पश्चिम भागात गेल्या पंधरा वीस दिवसांपासून संततधार सुरू आहे; परंतु पावसाचा जोर कायम नसल्याने नद्या नाल्यांना अद्याप पूर देखील आलेली नाही. (dams in Dindori taluka have not water stored enough nashik news)

दिंडोरी तालुक्यातील करंजवण, वाघाड, पुणेगाव, ओझरखेड, पालखेड तिसगाव ही धरणे पूर्व भागातील नांदगाव, येवला, मनमाड, पिंपळगाव आदी भागांची तहान भागवतात; परंतु आज धरणांतच अल्प जलसाठा आहे.

त्यामुळे पूर्व भागातील नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. चांदवड, नांदगाव भागांतील शेतकरी दिंडोरी तालुक्यातील नातेवाइकांना भ्रमणध्वनीवरून संपर्क करून धरणांतील साठ्याबद्दल व पावसाबद्दल विचारणा करत आहेत.

तालुक्यातील सध्याच्या पावसाची स्थिती पाहता ननाशी पट्ट्यात पाऊस सतत पडत आहे. पावसामुळे ओल कायम टिकून आहे, पण पावसाची तीव्रता जास्त नसल्याने अद्याप नद्यांना पूर आलेला नाही. पाहिजे तसा जलसाठाही साचलेला नाही. पेरणीपुरताच पाऊस झाला आहे. नागरिक मुसळधारेच्या आगमनाची वाट शेतकरी पाहत आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Depleted water storage in the dam
Koyna Dam : मोठा दिलासा! कोयना धरण आलं भरत, धरणात 'इतका' TMC पाणीसाठा तर महाबळेश्वरला 110 मिलिमीटर पाऊस

पश्चिम पट्ट्यातील ननाशी, महाजे, गोळशी, आंबेगण, विळवंडी, चिकाडी, धोंडाळपाडा, देवघर, देवसाने, पांढरी, भनवड, मोखनळ आदी भागांत पाऊस रोज हजेरी लावत आहे. नद्या-नाले वाहू लागले आहेत, त्यामुळे ओल जरी कायम दिसत असली, तरी जलसाठा मात्र वाढताना दिसत नाही. तालुक्यातील इतर धरणांपेक्षा तिसगाव धरण अजून कोरडेच असून ओझरखेड धरणातही अत्यल्प पाणीसाठा आहे.

ओझरखेड धरणातून चांदवड तालुक्यातील छत्तीस गावांमध्ये पाणीपुरवठा करणारी योजना कार्यान्वित आहे. वणी शहराला या धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. लखमापूर औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांना पाणीपुरवठा नियमित होतो, तसेच पाणी वापर संस्था या धरणातील पाण्याचा वापर करतात.

सप्तशृंग गडावरील पर्वतरांगांतील पावसाचे काही भागातील पाणी, तसेच पायथ्याशी असलेल्या नद्या, नाले, अहिवंतवाडी, भातोडे व परिसरातील भूभागावरील नद्या, नाले, ओहोळ, तसेच ओझरखेड धरणात विविध स्रोतांद्वारे धरणे भरली जातात.

Depleted water storage in the dam
Almatti Dam : 'आलमट्टी'तून पुन्हा विसर्ग वाढवला; जलाशय उद्या भरण्याची शक्यता, धरणात 99 टक्के साठा

पुणेगाव धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर त्यातील जलसाठा ओझरखेड धरणात सोडण्यात येतो. तेव्हा ओझरखेड धरण भरते, असा प्रतिवर्षीचा अनुभव आहे. मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी पुणेगाव धरणात जाण्यासाठी पर्यायी व्यवस्थेमुळे पुणेगाव धरणाचा साठा समाधानकारक असला तरी पुणेगाव धरण लवकर भरल्यानंतर ओझरखेड धरण भरण्याच्या आशा जीवंत आहेत. मागीलवर्षी जुलै महिनाअखेर सर्व धरणे भरली होती. यंदा मात्र धरणांमध्ये पुरेसा जलसाठा नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

तालुक्यातील धरणसाठा (३ ऑगस्टअखेरचा)

करंजवण ४६

ओझरखेड २८

पालखेड ६६

पुणेगाव ७५

वाघाड ५७

तिसगाव ००

Depleted water storage in the dam
Nashik Tringalwadi Dam : त्रिंगलवाडीचे धरणही भरले 100 टक्के; पावसाळी पर्यटकांची वाढली वर्दळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com