Nashik Kalaram Mandir : पोलिस आयुक्तांकडून श्री काळारामाचे दर्शन

अयोध्येतील रामलल्ला मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अवघे नाशिक शहर राममय झाले होते.
Police Commissioner Sandeep Karnik, Deputy Commissioner Kiran Kumar Chavan, Assistant Commissioner Nitin Jadhav and trustees of the temple at Shri Kalaram temple.
Police Commissioner Sandeep Karnik, Deputy Commissioner Kiran Kumar Chavan, Assistant Commissioner Nitin Jadhav and trustees of the temple at Shri Kalaram temple.esakal

Nashik Kalaram Mandir : अयोध्येतील रामलल्ला मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अवघे नाशिक शहर राममय झाले होते. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, यासाठी कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

दरम्यान, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनीही श्री काळाराम मंदिराचे दर्शन घेत बंदोबस्ताची पाहणी केली. ()

पंचवटीतील श्री काळाराम मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची दर्शनासाठी रांग लागली होती. सायंकाळी याठिकाणी शिवसेनेच्या उबाठा गटाचे पक्षप्रमुख उद्‌धव ठाकरे यांच्या हस्ते महापूजा असल्याने त्या पार्श्वभूमीवर चोख पोलिस बंदोबस्ताचे नियोजन होते.

पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, परिमंडळ एकचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक आयुक्त नितीन जाधव, पंचवटीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सोहन माछरे यांनी श्री काळारामाचे दर्शन घेत बंदोबस्ताचा आढावा घेतला.

Police Commissioner Sandeep Karnik, Deputy Commissioner Kiran Kumar Chavan, Assistant Commissioner Nitin Jadhav and trustees of the temple at Shri Kalaram temple.
Nashik Kalaram Mandir : श्री काळारामाला आज नव्या द्राक्षवाणांची आरास; सेवाभावी संस्थांना द्राक्षांची प्रसाद भेट

वाढत्या भाविकांच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी पोलिसांना सूचनाही यावेळी आयुक्तांनी दिल्या. याशिवाय, पंचवटीसह भाविकांची गर्दी होणाऱ्या मंदिरांच्या ठिकाणीही पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता. त्याचप्रमाणे, शहरातील चौकांमध्येही राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्ताने आरतीचे आयोजन केले गेले होते.

अशा ठिकाणीही पोलिस ठाणेनिहाय बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता. तसेच, काही संघटनांकडून रॅली काढण्यात आल्या. यामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असल्याने वाहतूक पोलिसही ठिकठिकाणी वाहतूक सुरळीत करण्यासाठी तैनात होते.

Police Commissioner Sandeep Karnik, Deputy Commissioner Kiran Kumar Chavan, Assistant Commissioner Nitin Jadhav and trustees of the temple at Shri Kalaram temple.
Nashik Kalaram Mandir : शहरातील मंदिरांना चोख पोलिस बंदोबस्त; काळाराम मंदिरात भाविकांची होणार गर्दी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com