MBA Executiveच्‍या प्रवेश अर्जाची 12 पर्यंत मुदत

 MBA
MBAesakal
Updated on

नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्‍या (SPPU) नाशिक उपकेंद्रामार्फत एमबीए एक्झिक्युटिव्ह (MBA Executive) हा शिक्षणक्रम उपलब्‍ध करून दिला आहे. या अभ्यासाच्‍या प्रवेशासाठी इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांना १२ जुलैपर्यंत अर्ज सादर करता येणार आहे. (Deadline for admission application of MBA Executive up to 12 july Nashik Education News)

शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून हा शिक्षणक्रम उपलब्‍ध केला होता. पहिल्‍या बॅचपासून शिक्षणक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. एमबीए (एक्झिक्युटिव्ह) हा अद्वितीय आणि विचारपूर्वक तयार केलेला दोन वर्षांचा पूर्णवेळ अभ्यासक्रम आहे. कार्यकारी अधिकारी, उद्योजकांसाठी विकसित केलेला हा शिक्षणक्रम आहे. व्यावसायिक, नोकरदारांसाठी तयार केलेला असल्याने याचे अभ्यासवर्ग सायंकाळी साडेसहा ते रात्री साडेनऊ या वेळेत व्यवस्थापनशास्त्र अभ्यासक्रमाच्या परिसरात घेतले जातात. या अभ्यासक्रमास विद्यार्थी विपणन, वित्त ऑपरेशन्स किंवा मानव संसाधन व्यवस्थापन यासारख्या स्पेशलायझेशनची निवड करू शकतात. पात्रतेच्या निकषांबद्दल एमबीए (एक्झिक्युटिव्ह) प्रवेशाविषयी तपशीलवार अधिसूचना विद्यापीठाच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

 MBA
राज ठाकरे हेच खरे हिंदुत्वाचे वारसदार; मनसे नेते बाळा नांदगावकर

येथे साधता येईल संपर्क

एमबीए (एक्झिक्युटिव्ह) शिक्षणक्रमाच्‍या प्रवेशासाठी शैक्षणिक पात्रताधारक उमेदवाराकडून ऑनलाईन प्रवेश परीक्षेसाठी अर्ज मागविले आहेत. येत्‍या १२ जुलैपर्यंत ऑनलाइन स्वरूपात अर्ज करता येणार आहे. या संदर्भातील संपूर्ण माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या https://campus.unipune.ac.in/ccep/login.aspx या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 'व्यवस्थापनशास्त्र अभ्यासक्रम, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, उपकेंद्र नाशिक, अचानक चौक, पडसाद कर्णबधिर विद्यालयाजवळ, लेखानगर, सिडको' येथे संपर्क साधता येईल.

 MBA
बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com