
अग्निपथ भरती प्रक्रियेसाठी अर्जाची 5 जुलैपर्यंत मुदत
नाशिक : राष्ट्रीय स्तरावर एकीकडे विरोध होत असताना भारतीय वायूसेनेतर्फे (Indian Air force) अग्निपथ योजनेंतर्गत (Agnipath scheme) भरती प्रक्रिया सुरू केली आहे. अग्निवीरवायू या पदाकरिता अर्ज प्रक्रिया सध्या सुरू असून, इच्छुक व पात्र उमेदवारांना ५ जुलैपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. लष्करात कंत्राटी पद्धतीने (Contract Basis) राबविल्या जाणाऱ्या भरती प्रक्रियेला राष्ट्रीय स्तरावर विरोध होत आहे. असे असताना दुसरीकडे भरती प्रक्रिया हाती घेण्यात आलेली आहे. अग्निवीरवायू म्हणून भारतीय सेनेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांकरीता कॉन्स्टेबल आणि इतर पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे. (Deadline for application for Agneepath recruitment process is 5th July Nashik News)
हेही वाचा: नाशिकचा आगामी पालकमंत्री कोण?
शैक्षणिक अटी व शर्तींची पुर्तता करणाऱ्या उमेदवारांना अर्ज करता येईल. अर्ज करणाऱ्या उमेदवारांना दहावी- बारावीची गुणपत्रिका किंवा तीन वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाचे अंतिम वर्षाची गुणपत्रिका किंवा दोन वर्ष वोकेशनल कोर्सची गुणपत्रिका, नॉन वोकेशनल कोर्स विषय (इंग्लिश, भौतिकशास्त्र, गणित) असे विषय असणे अनिवार्य असेल. २९ डिसेंबर १९९९ ते २९ जून २००५ दरम्यान जन्मलेले उमेदवार अर्ज करू शकतील. उंची कमीत कमी १५२. ५ सेंटीमीटर असावी. छाती कमीत- कमी ५ सेंटीमीटर फुगवता आली पाहिजे. तसेच वैद्यकीयदृष्टया सक्षम असणे आवश्यक आहे. इच्छुकांना ५ जुलैच्या सायंकाळी पाचपर्यंत http://agnipathvayu.cdac.in या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येईल. अधिक माहितीसाठी भारतीय वायूसेनेच्या अधिकृत संकेतस्थळ http://agnipathvayu.cdac.in किंवा http://indianairforce.nic.in या संकेतस्थळाला भेट देता येईल.
हेही वाचा: Nashik : सोशल मीडियावर बदनामी करून खंडणीची मागणी
Web Title: Deadline For Application For Agneepath Recruitment Process Is 5th July Nashik News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..