MBA CET Exam : एमबीए सीईटीच्या नोंदणीसाठी 4 मार्चपर्यंत मुदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mba cet exam

MBA CET Exam : एमबीए सीईटीच्या नोंदणीसाठी 4 मार्चपर्यंत मुदत

मालेगाव (जि. नाशिक) : व्यवस्थापनशास्त्र शाखेतील एमबीए/एमएमएस या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी येत्या १८ व १९ मार्चला सीईटीची (CET) परीक्षा घेतली जाणार आहे. (Deadline for MBA CET registration is March 4 nashik news)

परीक्षेची अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र उमेदवारांना ४ मार्चपर्यंत अर्ज भरता येणार असल्याची माहिती डॉ. बी. व्ही. हिरे कॉलेज ऑफ मॅनेजमेंट ॲडव्होकेट रिसर्च सेंटरचे संचालक डॉ. सुभाष जाधव यांनी दिली आहे.

एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी सेलकडून ही घोषणा करण्यात आली आहे. २०२३-२४ करिता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत तंत्रशिक्षण विभागांतर्गत असलेल्या एमबीए/ एमएमएस या व्यावसायिक पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी २०२३ ही सामाईक प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

इच्छुक विद्यार्थ्यांना ४ मार्चपर्यंत अर्ज भरावयाचा आहे. एमबीए अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरणे तसेच प्रवेश परीक्षेसाठी महाविद्यालयात मार्गदर्शन केंद्र सुरु झाले आहे.

टॅग्स :NashikexamMBA-CET