Girls ITI Online Admission: मुली आयटीआयमध्ये ऑनलाइन प्रवेशासाठी 11 जुलैपर्यंत मुदत

Students admitted for admission to Industrial Training Institute for Girls.
Students admitted for admission to Industrial Training Institute for Girls.esakal

Girls ITI Online Admission : राज्यातील सर्वोत्कृष्ट औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा पुरस्कार २०२०-२१ मध्ये मिळवून राज्यातील विशेषतः महिलांच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आघाडीवर असणारी संस्था म्हणून नाशिकमधील मुलींच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने आपली ओळख तयार केली आहे.

संस्थेत प्रवेशासाठी ११ जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येतील. प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी १३ जुलैला प्रदर्शित होईल. प्राचार्य दीपक बाविस्कर यांनी ही माहिती दिली. (Deadline for online admission in Girls ITI is 11th July nashik)

श्री. बाविस्कर म्हणाले, की संस्थेत विविध ११ व्यवसाय अभ्यासक्रमाच्या २६ तुकड्या असून, या वर्षापासून वीजतंत्री हा व्यवसाय अभ्यासक्रम नव्याने सुरू करण्यात येत आहे. संस्थेतील ५७२ जागांसाठी प्रवेश प्रक्रिया १२ जूनपासून सुरू झाली आहे.

प्रवेशासाठी मुलींकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. ५७२ जागांसाठी आतापर्यंत १ हजार ४१ मुलींनी आपली पसंतीक्रम नोंदवलेला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Students admitted for admission to Industrial Training Institute for Girls.
ITI Admission : ‘आयटीआय’च्या प्रवेशासाठी अर्ज भरण्यासाठी ऑनलाइन प्रक्रिया सुरू

नाशिकमधील मुलींच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ड्रेस मेकिंग, पेंटर जनरल, कॉस्मेटॉलॉजी, इंटेरियर डेकोरेशन अँड डिझायनिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अशासोबत इतर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी मोठी मागणी नोंदवलेली आहे.

ज्या प्रशिक्षणार्थींना व्यवस्थापन कोट्यातंर्गत प्रवेश घ्यावयाचे आहेत, त्यांना सरकारने निश्चित केलेल्या शुल्कात व्यवस्थापन कोट्यामधून प्रवेशासाठी अर्ज करण्याची संधी उपलब्ध आहे. संस्थेत व्यवस्थापन कोट्यातंर्गत प्रत्येक व्यवसाय अभ्यासक्रमासाठी किमान चार जागा उपलब्ध असल्याची माहिती श्री. बाविस्कर यांनी दिली.

Students admitted for admission to Industrial Training Institute for Girls.
Education policy : शिक्षण : धोरणाला दिशा मिळाली पण गती हवी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com