World Skills Competition: कौशल्‍य स्‍पर्धा सहभागासाठी 7 जानेवारीपर्यंत मुदत; या संकेतस्‍थळावर करा नोंदणी

फ्रान्स (लिओन) येथे पुढील वर्षी २०२४ मध्ये जागतिक कौशल्य स्पर्धा होणार आहे.
skill competition
skill competition

World Skills Competition : फ्रान्स (लिओन) येथे पुढील वर्षी २०२४ मध्ये जागतिक कौशल्य स्पर्धा होणार आहे. याकरिता राज्य व जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नाव नोंदणीची मुदत ७ जानेवारीपर्यंत वाढविली आहे. (Deadline for skill competition participation is 7th January nashik news)

जागतिक कौशल्य स्पर्धेत सहभाग नोंदवण्यासाठी जिल्हा,‍ विभाग, राज्य आणि देशस्तरावर स्पर्धा घेतली जाणार आहे. यात कौशल्यधारक पात्र स्पर्धक निवडले जातील. ही स्पर्धा दर दोन वर्षांनी घेण्यात येते.

ही जगातील सर्वात मोठी व्यावसायिक शिक्षण आणि कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा असून जगभरातील वय वर्ष २३ वर्षांखालील तरुण आणि तरुणींसाठी त्यांच्यातील कौशल्य सादर करण्याची संधी असेल.

skill competition
Skill Development Mission : कौशल्य विकास मिशनला कुलगुरू शिष्यवृत्ती’चे बळ; व्यवस्थापन परिषदेचा निर्णय

या स्पर्धेमध्ये भारतातील कुशल उमेदवारांचे नामांकन करण्याच्या दृष्टीने नाशिक जिल्ह्यातील युवक-युवतींनी ‍विविध ५२ क्षेत्रामध्ये होणाऱ्या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी https://kaushalya.mahaswayam.gov.in यावर नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे.

पात्रतेसंदर्भातील तपशील संकेतस्‍थळावर उपलब्‍ध करून दिला असल्‍याचेही नमूद केले आहे.

skill competition
Content Writing Skills : कंटेंट रायटिंगमध्ये जॉब्सच्या भरपूर संधी, हे फ्रि कोर्स करून वाढवा Skills

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com