नाशिक : लग्नाचा बस्ता उरकून परतताना अपघातातील दुसऱ्याचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Death

नाशिक : लग्नाचा बस्ता उरकून परतताना अपघातातील दुसऱ्याचा मृत्यू

sakal_logo
By
युनूस शेख

जुने नाशिक : लग्नाचा बस्ता उरकून परतताना झालेल्या अपघातात वसंत शंकर मांडोळे (५५, रा. पाथर्डी फाटा) यांचा मृत्यू झाला होता. अन्य दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना राजीव शंकर मांडोळे पाटील (४७, रा. कामटवाडे अंबड) यांचा बुधवारी (ता.१७) मृत्यू झाला.

रवींद्र शंकर मांडोळे (५१, रा. सिडको) यांचा मुलगा गणेश मांडोळे याच्या लग्नाच्या बस्त्यासाठी रवींद्र यांच्यासह त्यांचे तीन भाऊ देविदास शंकर मांडोळे, राजू शंकर मांडोळे, मृत वसंत शंकर मांडोळे असे चौघे शनिवारी (ता.१३) सकाळी जळगाव पारोळा येथे गेले होते. उड्डाणपुलावरून जळगावच्या दिशेने सिडकोकडे जात असताना द्वारका ट्रॅक्टर हाऊस परिसरात रस्त्यात उभा असलेला कंटेनर (एनएल- ०१- एए-९०३४) वर त्यांची अल्टो कार (एमएच- १५- एफएफ- ९४५८) जाऊन आढळली. त्यात चौघेजण जखमी झाले. उपचार सुरू असताना वसंत मांडोळे यांचा मृत्यू झाला होता. देविदास आणि राजीव गंभीर जखमी असल्याने कुटुंबीयांनी त्यांना खासगी रुग्णालयात हलविले होते. उपचारादरम्यान राजीव मांडोळे पाटील यांचादेखील मृत्यू झाला. तीन दिवसापासून त्यांची मृत्यूशी झुंज सुरू होती. भद्रकाली पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: नाशिक : एसटी कर्मचारी आंदोलनाची धार जिल्ह्यात अद्याप कायम

हेही वाचा: विंचूर येथे युवकाचा अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न

loading image
go to top