esakal | दोन कोवळ्या लेकींच्या डोक्यावरील छत्र हिरावले; ती एक अंगावर काटा आणणारी घटना

बोलून बातमी शोधा

nashik oxygen leak
दोन कोवळ्या लेकींच्या डोक्यावरील छत्र हिरावले; ती एक अंगावर काटा आणणारी घटना
sakal_logo
By
कुणाल संत

नाशिक : नाशिकमध्ये बुधवारी घडलेल्या मृत्यूच्या तांडवात अनेकांनी आपले वडील, पती, पत्नी, आई, भाऊ गमविला. या घटनेला २४ तास उलटून गेल्यानंतरही ही कुटुंबे अजूनही दु:खाच्या सावटात आहेत, तर कोणी रुग्णालयात दाखल असलेल्यांसाठी अजूनही धावपळ करत आहे. ज्यांनी आपले आप्तेष्ठ गमविले आहे, त्यांच्यामागे आता केवळ त्यांच्या आठवणी उरल्या आहेत. या घटनेत कोवळ्या दोन लहान मुलींच्या डोक्यावरील छत्रच हरविले आहे.

हेही वाचा: नाशिक ऑक्सिजन गळती : संशय बळावला! ऑक्सिजन ठेकेदार कंपनीचा लागेना थांगपत्ता

आता कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी आमच्यावरच

अंबड लिंक रोड परिसरातील म्हाडा कॉलनीत राहणारे सुनील झाल्टे (३३, रा. आर्णी, धुळे) यांचाही या घटनेत मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूमुळे कोवळ्या दोन लहान मुलींच्या डोक्यावरील छत्रच हरविले आहे. यात मोठ्या मुलीचे वय पाच, तर लहान मुलीचे वय अवघे तीन वर्षे आहे. शुक्रवारी (ता. २३) मोठ्या मुलीचा पाचवा वाढदिवस होता. सुनील झाल्टे यांनी वाढदिवशी घरी घेऊन जाण्याची मागणी मेहुणे अविनाश बिऱ्हाडे यांच्याकडे केली होती. मात्र, दोन दिवस अगोदरच मृत्यूने त्यांना कवटाळले. बिऱ्हाडे म्हणाले, की २४ तासांनंतरही अजून सर्व दु:खात आहोत. मुलींना काय घटना घडली आहे, याची कल्पना नाही. आता कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी आमच्यावरच असून, समोर दु:खाचा डोंगर उभा आहे.

हेही वाचा: नाशिक ऑक्सिजन गळती दुर्घटना : उच्चस्तरीय चौकशी समितीत कोण कोण असणार?