esakal | केटरिंग व्यावसायिकांवर कर्ज काढून जगण्याची वेळ; विवाह सोहळ्याच्या हंगामातच बंदीचा फटका
sakal

बोलून बातमी शोधा

catering

केटरिंग व्यावसायिकांवर कर्ज काढून जगण्याची वेळ

sakal_logo
By
युनूस शेख

नाशिक : विवाह सोहळे आणि विविध कार्यक्रमांवर बंदी आल्याने केटरिंग व्यावसायिकांची(catering business)उपासमार होत आहे. विवाह सोहळ्याच्या हंगामात नेमकी बंदी आल्याने सध्या त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना कर्ज काढून जीवन जगण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांत विवाह सोहळ्यांचा हंगाम असतो. जून मध्यापर्यंत मोठ्या उत्साहात विवाह सोहळे होतात. त्यावर केटरिंग व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांचा वर्षभराचा उदरनिर्वाह चालतो. (debt-on-catering-business-due-lockdown-nashik-marathi-news)

सर्वांना लॉकडाउनचा मोठा फटका

यंदा मात्र फेब्रुवारीपासूनच लॉकडाउन घोषित केला होता. कुठल्याही प्रकारचे कार्यक्रम, विवाह सोहळे होऊ शकले नाहीत, यावर आधारित केटरिंग व्यवसाय करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. सध्या छोटेखानी विवाह सोहळे होत आहेत. लॉकडाउनपूर्वी झालेल्या सोहळ्यांमुळे यंदाचा हंगाम केवळ दहा टक्के होऊ शकला. सुमारे पंधरा ते वीस कोटींचे नुकसान झाले. शहरात सुमारे ५० ते ६० व्यावसायिक आहेत. या सर्वांना लॉकडाउनचा मोठा फटका बसला. गेल्या वर्षीही याच हंगामात लॉकडाउन झाले होते. त्यापूर्वी व्यवसाय सुरळीत होता. त्या वेळी त्यांनी उदरनिर्वाहासाठी जमून ठेवलेल्या रकमेवर गेल्या वर्षीचा लॉकडाउनचा काळ त्यांच्याकडून काढण्यात आला. त्या वेळी नुकसान झाले. मात्र उपासमारीची वेळ आली नाही. यंदा मात्र गेल्या वर्षीचा पूर्ण लॉकडाउन आणि यंदाही लॉकडाउन असल्याने त्यांना रक्कम जमा करणे शक्य होऊ शकले नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊन परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. बरेच व्यावसायिक नातेवाइकांकडून तसेच सावकारांकडून कर्ज घेऊन उदरनिर्वाह करत आहे. दुसरीकडे सध्या विवाह सोहळ्यांना परवानगी दिली असली तरी छोटेखानी सोहळे होत असल्याने अद्याप या व्यवसायाला हवी तशी चालना मिळालेली नाही.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा केटरिंग व्यवसायावर अधिक परिणाम झाला आहे. विवाह सोहळ्याच्या हंगामात लॉकडाउन आल्याने उपासमारीची वेळ आली आहे.

- अब्दुल कादीर शेख, केटरिंग व्यावसायिक

काही दिवसांपासून विवाह सोहळ्यांना परवानगी देण्यात आली असली, तरी केवळ ५० लोकांना सोहळ्यास उपस्थित राहता येणार आहे. छोटेखानी सोहळे होत आहेत. त्यामुळे घरच्या घरी स्वयंपाक करून सोहळे पार पडत आहे. एक दोन ऑर्डर येत आहे. त्यातही अतिशय तुटपुंज्या रकमेवर ऑर्डर स्वीकारावी लागत आहे.

- अनिस अन्सारी, केटरिंग व्यावसायिक

हेही वाचा: नाशिकमध्ये आता दुसरा 'मॅग्नाइट मॅन'!बघण्यासाठी गर्दी

हेही वाचा: भीषण! एकमेकांवर आदळून नऊ वाहने अपघातग्रस्त