Nashik News : उड्डाणपुलाच्या अंतिम टप्प्यातील कामासाठी निर्णय; धुळे, पुण्याकडे जाणाऱ्या बस जुन्या स्थानकावरून

राज्य परिवहन विभागाने धुळे व पुणे या दोन मार्गावरील धुळे, जळगाव, पुणेकडे जाणाऱ्या बस जुन्या बसस्थानकावरून सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
 flyover ( file Photo )
flyover ( file Photo )esakal

Nashik News : शहरातील जुन्या महामार्गावरील बहुप्रतिक्षित उड्डाणपुलाच्या अंतिम टप्प्यातील कामासाठी नवीन बसस्थानक ते दरेगावपर्यंत एकतर्फी अवजड वाहतूक बंद केल्यानंतर आता राज्य परिवहन विभागाने धुळे व पुणे या दोन मार्गावरील धुळे, जळगाव, पुणेकडे जाणाऱ्या बस जुन्या बसस्थानकावरून सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

उशिरा का होईना यामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. (Decision for final phase of flyover bridge work in malegaon nashik news)

‘सकाळ’ने १३ डिसेंबरला उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात असताना उपाययोजना न केल्याने होणाऱ्या वाहतूक कोंडी संदर्भात ‘वाहतूक कोंडीची समस्या बनली अधिक जटील’ या आशयाचे वृत्त ‘सकाळ’ने प्रसिद्ध केले होते. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपाययोजनेत जुन्या बसस्थानकावरून बस सोडण्याचे सुचविले होते. यापूर्वी ४ जानेवारीपासून अखेरच्या टप्प्यातील स्लॅब व अन्य कामासाठी एकेरी वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

त्याचवेळी जुन्या बसस्थानकावरून बस सोडण्याचा निर्णय अपेक्षित होता. १८ जानेवारीपासून जुन्या बसस्थानकावरून या दोन मार्गावरील बस जुन्या बसस्थानकावरून सोडण्यात येणार आहेत. नाशिक विभागीय नियंत्रक अरुण सिया यांनी या बदलाचे पत्रक व आदेश राज्यातील सर्व विभागांना पाठविले आहे.

 flyover ( file Photo )
Nashik News : शिर्डी महामार्गावर साईभक्तांचा प्रवास ‘राम भरोसे’; उपायोजनांकडे ‘न्हाई’चे दुर्लक्ष

जुन्या बसस्थानकावरून कळवण, सटाणा, औरंगाबाद, सुरत या मोजक्याच मार्गावरील बस सुटतात. या बसस्थानकाचे अखेरचे तीन ते चार फलाट रिकामे देखील आहेत. यामुळे नवीन बदलात कुठलीही अडचण उद्‌भवणार नाही. प्रसंगी नवीन बसस्थानक व परिसरातील कोंडी कमी करण्यासाठी या बस कायमस्वरूपी जुन्या बसस्थानकावरून सोडल्यास प्रवाशांची सोय होईल. वाहतूक कोंडीही कमी होईल.

यापूर्वी वाहतूक मार्गातील बदल

शहरात धुळे बाजूकडून येणाऱ्या बसला एकेरी मार्गाने प्रवेश दिला जातो. येथील बसस्थानकातून धुळे, जळगाव, चाळीसगावकडे बाहेर जाणाऱ्या सर्व बस मोसमपूलमार्गे बायपासने मनमाड चौफुलीकडून जातात. पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत या मार्गातील हा बदल कायम असेल. अवजड वाहनांसाठी नवीन बसस्थानक ते दरेगावपर्यंतचा मार्ग बंद करण्यात आला आहे. महानगरपालिका प्रशासनाने बसस्थानकाजवळ जाणाऱ्या मार्गावर लोखंडी कमान उभारून मोठ्या वाहनांना अटकाव केला आहे.

कमानीखालून दुचाकी, तीन चाकी व चारचाकी हलकी वाहने जातात. धुळे, चाळीसगाव, पाचोरा, शिरपूर, जळगाव, भुसावळ, चोपडा, शहादा, नंदुरबारकडून येणाऱ्या बस शहरात प्रवेश करताना दरेगाव ते नवीन बसस्थानकापर्यंतच्या एकेरी मार्गाचा अवलंब करतात. धुळ्याकडे जाणाऱ्या बस नवीन बसस्थानकातून जुन्या शिवाजी महाराज पुतळा, मोसमपूलमार्गे मनमाड चौफुलीने बायपासने जात आहेत. यामुळे बसच्या अंतरात ९.३ किलोमीटर दीड टप्प्याची वाढ झाल्याने बस भाड्यात १५ रुपये वाढ झाली आहे.

 flyover ( file Photo )
Nashik News : द्राक्षबागा वाचविण्यासाठी बळीराजांची धावपळ; ठिबकद्वारे पाणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com