esakal | VIDEO : मराठा आरक्षण : सकल मराठा क्रांती मोर्चातर्फे राज्य शासनाच्या निर्णयांची होळी
sakal

बोलून बातमी शोधा

maratha 123.jpg

सकल मराठा क्रांती मोर्चाच्या राज्य समन्वयकांच्या राज्यस्तरीय बैठकीच्या प्रारंभीच राज्य शासनाच्या आठ निर्णयांची होळी करण्यात आली. मराठा आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी नाशिकमध्ये आयोजित या बैठकीस खासदार संभाजी राजे प्रामुख्याने मार्गदर्शन करत आहेत.

VIDEO : मराठा आरक्षण : सकल मराठा क्रांती मोर्चातर्फे राज्य शासनाच्या निर्णयांची होळी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : सकल मराठा क्रांती मोर्चाच्या राज्य समन्वयकांच्या राज्यस्तरीय बैठकीच्या प्रारंभीच राज्य शासनाच्या आठ निर्णयांची होळी करण्यात आली. मराठा आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी नाशिकमध्ये आयोजित या बैठकीस खासदार संभाजी राजे प्रामुख्याने मार्गदर्शन करत आहेत.

राज्य शासनाच्या आठ निर्णयांची होळी

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरीम स्थगिती दिल्यानंतर समाजात उफाळून आलेला असंतोष आणि त्या अनुषंगाने राज्य शासनाने निर्णय घेऊन दिलासा देण्याचा केलेला प्रयत्न यासंदर्भात चर्चा करून आंदोलनाची पुढिल दिशा ठरविण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान बैठकीला सुरुवात होण्याच्या आतच राज्य शासनाने अलीकडेच मराठा समाजाला दिलासा देण्यासाठी घेतलेल्या निर्णयांची होळी तुषार गवळी, अमित नडगे, सुदर्शन निमसे, किशोर तिडके, सचिन पवार, अविनाश पाटील आदींनी केली.

हेही वाचा > भीषण! ३५ हून अधिक मजुरांचा तो कानठळ्या बसविणारा आवाज; महामार्गावरील थरार

हेही वाचा > ३०हून अधिक कोविड रुग्णालये नाशिक शहरात रातोरात उभी! प्रशासनाचा खुलासा 

loading image
go to top