विद्यार्थ्यांनो.. आयटी, वाणिज्‍य क्षेत्रात करिअर करायचंय? पदवी शिक्षणाचे 'हे' अनोखे पर्याय

CA_STUDENT.jpg
CA_STUDENT.jpg

नाशिक : बारावीनंतरच्‍या काही पदवी अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया सध्या सुरू आहे. कुठल्‍याही शाखेतून कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण घेऊन आयटी क्षेत्रात करिअर करू इच्‍छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बीबीए (सीए) रूपी मार्ग खुला आहे. विविध विषयांतून बीबीए शिक्षण घेत वाणिज्‍य, व्‍यवस्‍थापन शास्त्र शाखेत करिअरचा पर्याय उपलब्‍ध आहे. सध्या या अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया संस्‍था, महाविद्यालय स्‍तरावर सुरू आहे. 

बीबीए (सीए), बी. एस्सी. कॉम्‍प्‍युटर प्रवेशप्रक्रिया सुरू 
आयटी क्षेत्रात गेल्‍या काही वर्षांत चांगले करिअर घडविल्‍याची अनेक उदाहरणे असल्‍याने विद्यार्थ्यांचा या क्षेत्राकडे कल वाढत आहे. परंतु, अभियांत्रिकी शिक्षण न घेता कला, वाणिज्‍य किंवा विज्ञान शाखेतून बारावीचे शिक्षण घेतलेल्‍या विद्यार्थ्यांनाही आयटी क्षेत्रात करिअरची संधी खुली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत बीबीए (सीए) या शिक्षणक्रमास प्रवेश घेतलेल्‍या विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ होऊ शकतो. सत्र पद्धतीने तीन वर्षांच्या या पदवी अभ्यासक्रमानंतर पुढे एमसीए या पदव्‍युत्तर पदवी शिक्षण घेण्याचा पर्याय खुला असतो. तसेच, पदवी शिक्षण घेतानाच अन्‍य विविध कौशल्‍ये आत्‍मसात करता येऊ शकतात. क्रेडिट बेस चॉइस सिस्टिम असल्‍याने विद्यार्थ्यांना त्‍यांच्‍या कामगिरीच्‍या जोरावर यश मिळविता येऊ शकते. 

हेही वाचा > दुर्दैवी! बैलपोळ्याच्या पूर्वसंध्येला अचानक आलेल्या 'त्या' बातमीने ममदापूर हळहळले..काय घडले नेमके?

बीबीए, बीसीएसमध्येही संधी 
व्‍यवस्‍थापनशास्त्र, वाणिज्‍य शाखेतच करिअर करू इच्‍छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बीबीए या पदवी अभ्यासक्रमाचा पर्याय उपलब्‍ध आहे. या अंतर्गत बारावीनंतर कुठल्‍याही शाखेतील विद्यार्थ्यास प्रवेश मिळविता येऊ शकतो. तर बीबीएमध्ये घेतलेल्‍या विशेष विषयानंतर पुढे एमबीएचे पदव्‍युत्तर पदवी शिक्षण घेता येऊ शकते. पूर्वीचा बीसीएस अर्थात, बी. एस्सी. (कॉम्‍प्‍युटर सायन्‍स) हा देखील करिअरसाठीचा उत्तम पर्याय मानला जातो. विज्ञान शाखेतून गणित विषयासह उत्तीर्ण झालेले विद्यार्थी या शिक्षणक्रमास प्रवेश घेऊ शकतात. या अभ्यासक्रमास बारा विषय असल्‍याने गंभीरपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच हा विकल्‍प उपयुक्‍त ठरू शकतो. 

हेही वाचा > धाबे दणाणले! नियुक्ती होऊनही उमेदवार कामावर नाही?कारवाई तर होणारच

प्रवेश परीक्षा नसल्‍याने थेट प्रवेश 
या अभ्यासक्रमांसाठी केंद्रिभूत पद्धतीची कुठलीही प्रवेश परीक्षा घेतली जात नसल्‍याने महाविद्यालय किंवा शैक्षणिक संस्‍था पातळीवर प्रवेश दिले जात असतात. ‘मविप्र’तर्फे सध्या केटीएचएम महाविद्यालय वगळता विविध महाविद्यालयांची प्रवेशप्रक्रिया राबविली जात असून, अभ्यासक्रमांसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. 
 

बीबीए (सीए) अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आयटी क्षेत्रात करिअर करू इच्‍छिणाऱ्या विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा या अभ्यासक्रमाकडे कल वाढत आहे. तीन वर्षे शिक्षणानंतर नोकरी, व्‍यवसायासह पदव्‍युत्तर शिक्षणाचाही पर्याय विद्यार्थ्यांपुढे उपलब्‍ध आहे. -प्रा. ज्ञानेश आहेर, संगणकशास्त्र विभागप्रमुख, सीएमसीएस महाविद्यालय  

संपादन - अरुण मलाणी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com