नाशिक : IT पार्कसाठी 40 लाख चौरस फूट जागेची मागणी

IT park
IT parkesakal

नाशिक : महापालिकेकडून (NMC) आडगाव शिवारात IT पार्क उभारण्यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर IT कॉनक्लेव्ह सुरू असतानाच देशभरातील मोठ्या कंपन्यांनी जवळपास 40 लाख चौरस फूट जागेची मागणी केल्याचा दावा महापौर (Mayor) सतीश कुलकर्णी (Satish Kulkarni) यांनी केला.

IT park
Pune-Nashik Railway: सेमी हायस्पीड रेल्वे ४ वर्षांत धावणार

महापालिकेकडून (NMC) आडगाव शिवारात 365 एकर क्षेत्रात IT पार्क उभारले जात आहे. IT पार्कसाठी महापालिकेची स्वमालकीची दहा एकर जागा आहे. उर्वरित जागा एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट ( Expression of Interest) या तत्त्वावर जागा मालकांकडून भाडे तत्त्वावर घेतली जाणार आहे. त्यासाठी जवळपास 10 जागा मालकांनी इच्छा दर्शविली आहे. एकीकृत नियमावलीतील तरतुदीनुसार ग्रीन बेल्टमध्ये आयटी पार्क उभारता येईल. त्यासाठी अतिरिक्त F.S.I. (Floor Space Index) तरतूद आहे.

IT park
भावाला नोकरी लावण्याच्या बहाण्याने महिलेचा विनयभंग | Nashik

यात 50 % जागा IT पार्कसाठी, 20 % जागेवर निवासी क्षेत्र, 5 % जागेत ॲमेनिटी, तर 5 % जागा व्यवसायासाठी अशी तरतूद आहे. आयटी कॉनक्लेव्हमध्ये TCS (Tata Consultancy Services),सीन टेल, क्रेडीटसिस, इन्फोसिस, विप्रो, केपीआयटी आदी 15 राष्ट्रीय स्तरावरील कंपन्यांनी सहभाग नोंदविला, तर स्थानिक 75 आयटी कंपन्या सहभागी झाल्या. IT परिषद सुरू असतानाच विविध IT कंपन्यांकडून 40 लाख चौरस फूट जागेची मागणी नोंदविण्यात आल्याची माहिती महापौर कुलकर्णी यांनी दिली.

IT park
भोंदूबाबाचा आईसह तिन मुलींवर बलात्कार | Nashik

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com