Nashik Winter Weather Update : पारा 13.3 अंशांवर; हंगामातील नीचांकी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

winter season

Nashik Winter Weather Update : पारा 13.3 अंशांवर; हंगामातील नीचांकी

नाशिक : सायंकाळनंतर वातावरणात गारवा जाणवत असल्‍याने नाशिककरांना हुडहुडी भरत आहे. गेल्‍या काही दिवसांत गारव्‍यात वाढ झाल्‍याने पाऱ्यातही घसरण झाली आहे. रविवारी (ता. ३०) नाशिकचे किमान तापमान १३.३ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. यंदाच्‍या हंगामातील हे नीचांकी तापमान ठरले. कमाल तापमान ३०.७ अंश सेल्सिअस होते. (Nashik Winter Weather Update Mercury under 14 degrees Nashik News)

हेही वाचा: Nashik : दिवाळीच्या गोड- धोड फराळानंतर खवय्यांचा ‘मटण, चिकन’वर ताव!

गेल्‍या २५ ऑक्‍टोबरला नाशिकचे किमान तापमान १३.४ अंश, तर कमाल तापमान ३०.४ अंश सेल्सिअस होते. त्‍यानंतरच्‍या दिवसांत काही प्रमाणात पारा वाढल्‍याचे बघायला मिळाले. रविवारी पारा घसरून नाशिकचे किमान तापमान १३.३ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. हे यंदाच्‍या हंगामातील नीचांकी तापमान ठरले. येत्‍या काही दिवसांत अशाचप्रकारे पारा घसरून थंडीत वाढ होण्याची शक्‍यता हवामान खात्‍याने वर्तविली आहे. थंडीचा परिणाम आतापासून बघायला मिळत असून, सायंकाळनंतर शहर परिसरातील रस्‍त्‍यांवरील वर्दळ कमी झाल्‍याचे बघायला मिळत आहे.

दरम्‍यान, दिवसा तप्त उन्हाचा अनुभव नागरिकांना येत आहे. त्‍यामुळे कमाल तापमान सध्या तरी ३० अंश सेल्सिअसपर्यंत वाढले आहे. वाढत्‍या थंडीसोबत कमाल तापमानातही घट होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

हेही वाचा: Nashik : एकत्रित दिवाळीची परंपरा कायम; मुळाण्यातील पाटील कुटुंबात 151 सदस्यांचा समावेश

टॅग्स :NashikTemperatureWinter