..म्हणून नाशिकचा उन्हाळ कांदा खातोय भाव; काय आहे सद्यस्थिती वाचा सविस्तर

Demand for summer onion has increased in the domestic market nashik marathi news
Demand for summer onion has increased in the domestic market nashik marathi news

नाशिक : पावसाने पाकिस्तानमधील साठवलेल्या कांद्याचे आणि श्रीलंकेतील नवीन कांद्याचे प्रत्येकी ७० टक्क्यांपर्यंत नुकसान केले. त्याचवेळी देशांतर्गत बाजारपेठेत दबदबा ठेवणाऱ्या मध्यप्रदेशातील कांद्याचे भाव वाढले. या साऱ्याचा परिपाक म्हणजे, देशांतर्गत बाजारपेठेत नाशिकच्या चाळीतील उन्हाळ कांद्याला मागणी वाढली आहे. शिवाय अरब राष्ट्रांमध्ये नाशिकहून कांदा रवाना होण्याचे प्रमाण वाढले. परिणामी, गेल्या तीन दिवसांमध्ये नाशिकच्या कांद्याने भाव खाण्यास सुरवात केली. गुरुवारी (ता. १०) दोन हजार ते दोन हजार ६०० रुपये क्विंटल भावाने कांदा विकला गेला. आज २ हजार २०० ते २ हजार ४०० रुपये असा भाव मिळाला. 

कोलंबोला आठवड्यात शंभर कंटेनर कांदा

श्रीलंकेत नवीन कांद्याचे उत्पादन ‘बंपर’ येणार असल्याने आयात शुल्क १५ रुपयांवरुन ५० रुपयांपर्यंत नेण्यात आले. मात्र, पावसाने कांद्याचे नुकसान केल्याने नवीन कांदा या महिन्याखेरपर्यंत पुरेल अशी स्थिती तयार झाल्याने गेल्या काही दिवसांपासून कोलंबोच्या व्यापाऱ्यांनी नाशिकच्या कांद्याची आयात सुरु केली. कोलंबोला पूर्वी तीनशे ते साडेतीनशे कंटेनर कांदा आठवड्याला जायचा. गेल्या आठवड्यात शंभर कंटेनर कांदा टनाला ४२० ते ४७० डॉलर या भावाने गेला आहे. सद्यस्थितीत कोलंबोसाठी टनाचा भाव ५०० डॉलरपर्यंत पोचला आहे. श्रीलंकेने वाढवलेले आयातशुल्क कमी करण्याखेरीज गत्यंतर राहिलेले नाही. पाकिस्तानमधील साठवलेल्या कांद्याचे नुकसान झालेले असताना पुढील महिन्यात येणाऱ्या नवीन कांद्याच्या उत्पादनात ३० टक्क्यांनी घट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याचवेळी ऑक्टोंबरमध्ये नवीन कांदा येणाऱ्या राजस्थानमधील लागवडीला महिनाभर उशीर झाला. त्यामुळे आता राजस्थानमधील नवीन कांदा नोव्हेंबरमध्ये बाजारात येईल. 

मध्यप्रदेशात २८ टक्के कांदा शिल्लक 

मध्यप्रदेशात पावसामुळे साठवलेल्या कांद्याचे पाच टक्क्यांपर्यंत नुकसान झाले असून, सद्यस्थितीत २८ ते ३० टक्के कांदा शिल्लक आहे. पण मध्यप्रदेशातील कांद्याचा भाव २५ रुपयांपर्यंत पोचल्याने दिल्ली, मुंबई, कोलकाताचे व्यापारी वाहतुकीवर खर्च करत नाशिकचा कांदा मागवत आहेत. दरम्यान, भारतीय कांद्याचा स्पर्धक असलेल्या हॉलंडमधील कांद्याचा टनाचा भाव ६०० डॉलर आहे. शिवाय चीनच्या कांद्याचा टनाचा भाव ४८० डॉलर आहे. अशा परिस्थितीत नाशिकचा उन्हाळ कांदा टनाला ५०० डॉलर भावाने दुबईला, ४८० डॉलर भावाने सिंगापूरला निर्यात केला जात असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. 
 
उन्हाळ कांद्याच्या भावाची स्थिती 

(आकडे क्विंटलला सरासरी रुपयांमध्ये) 
बाजारपेठ शुक्रवार (ता. ११) गुरुवार (ता. १०) बुधवार (ता. ९) मंगळवार (ता. ८) 
मुंबई- १ हजार ९५०, १ हजार ८००, १ हजार ८००, १ हजार ९०० 
येवला-, २ हजार २००, २ हजार ३००, २ हजार ३७५ - 
लासलगाव- २ हजार २००, २ हजार ४०१ , २ हजार ५०१,  २ हजार १०१ 
मुंगसे- २ हजार ३५०, २ हजार २, हजार ४७५ - 
कळवण- २ हजार ३५०, २ हजार ४५०, २ हजार ३००, २ हजार २०० 
चांदवड- २ हजार ३००, २ हजार ४५०, २ हजार ४२०, २ हजार १०० 
मनमाड- २ हजार ४००, २ हजार ४००, २ हजार ४००, २ हजार ५० 
सटाणा- २ हजार ३२५, २ हजार ३५०, २ हजार ४२५ - 
पिंपळगाव- २ हजार २५१, २ हजार ३०१, २ हजार ३५१, २ हजार १५० 
दिंडोरी- २ हजार ४००, २ हजार ६००, २ हजार १००, १ हजार ७५१ 
देवळा- २ हजार २५०, २ हजार ३५०, २ हजार ३००, २ हजार 
नामपूर- २ हजार ३०० ,२ हजार २५०, २ हजार ,२ हजार 

 
पावसाने दक्षिणेसह परदेशातील कांद्याचे नुकसान झाल्याने नाशिकच्या चाळींमधील उन्हाळ कांद्याला चांगला भाव मिळत आहे. अशातच, आज सकाळी साठवणूक मर्यादेची अफवा पसरली आणि क्विंटलला २०० रुपयांनी भाव घसरले. पण त्याबद्दलचे आदेश नसल्याने भाव सुधारण्यास सुरवात झाली. देशातंर्गत आणि जागतिक बाजारपेठेतील स्थिती पाहता, आणखी पंधरा दिवस चाळीतील उन्हाळ कांद्याचे भाव टिकून राहण्याची शक्यता आहे. 
-विकास सिंह, कांद्याचे निर्यातदार  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com