Nashik News : बिबट्याच्या कातडी विकणारा पोलिसांच्या जाळ्यात; ग्राहक बनून उधळला विक्रीचा डाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Deola police trap suspect who was selling  leopard skin

Nashik News : बिबट्याच्या कातडी विकणारा पोलिसांच्या जाळ्यात; ग्राहक बनून उधळला विक्रीचा डाव

देवळा (जि. नाशिक) : बिबट्याची (Leopard) कातडी विक्री करणाऱ्या एका संशयितास देवळा पोलिसांनी सापळा रचून जेरबंद केले. यावेळी पोलिसांनी त्याच्याकडून बिबट्याची कातडी देखील जप्त केली.

राजू वाळू जगताप (रा. आठबे, ता. कळवण) असे कातडी विकणारा संशयिताचे नाव आहे. (Deola police laid trap imprisoned suspect who was selling leopard skin nashik news)

संशयितास पकडण्यासाठी देवळा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ यांनी बनावट ग्राहक बनून विक्रीदाराशी संपर्क करत ही कारवाई फत्ते केली. सोमवार (ता.१३) रोजी सायंकाळी सहा वाजता ही कारवाई करण्यात आली

खर्डे शिवारात व निवाणबारी परिसरात बिबट्याची तस्करी करणारे काही जण असल्याची माहिती देवळा पोलिसांना मिळताच याची तत्काळ दखल घेत सहाय्यक पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ यांनी तातडीने सूत्रे हलवली.

खर्डे येथील पोलिस पाटील भारत जगताप यांना सोबत घेत बिबट्याच्या कातडीची विक्री करणाऱ्यांशी संपर्क साधत आपण कातडी खरेदी करण्यास इच्छुक असल्याचे सांगत त्यांना भेटण्यासाठी वेळ घेतली. संशयित यांनी श्री. शिरसाठ यांना निवाणबारीच्या निर्जुन स्थळी बोलावले.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

यावेळी श्री. शिरसाठ यांनी वेषांतर करत संशयित यांची भेट घेत सैदा करण्यास सुरवात केली. हा व्यवहार हा लाखांच्या पटीत ठरत असताना त्यांनी आपल्या पथकास इशारा करत पथकाने कातडी विक्री करणाऱ्या संशयितास अटक करत त्याच्याकडून बिबट्याची कातडी जप्त केली.

संशयित याच्याविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कामगिरी पोलिस उपनिरीक्षक महेश शिंदे, पोलिस हवालदार आर.पी.गवळी, ज्योती गोसावी, सुरेश कोरडे, वाहनचालक श्रावण शिंदे यांनी केली.

अडीच वर्षाचा बिबट्या

सदरची कातडी ही सुमारे दोन ते अडीच वर्षे वयाचा हा बिबट्या असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी लावला आहे. अटक केलेला संशयित हा शेती करत असून त्याच्याकडे ही कातडी कशी आली? यामागे अजून कोण कोण आहे ? या कारवाईमुळे जिल्ह्यातील अशा प्रकारच्या कातडी तस्करीचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

टॅग्स :NashikpoliceskinLeopard