Devendra Fadnavis Nashik Daura : इमारतीप्रमाणे कारभारही सुसज्ज असावा : उपमुख्यमंत्री फडणवीस

पोलिस ठाण्याचा कारभारदेखील चांगला दिसला पाहिजे, असे मत शनिवारी (ता. १०) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
Deputy Chief Minister Devendra Fadnavis inaugurating the newly equipped police station building. Neighbor MLA Seema Hire and dignitaries.
Deputy Chief Minister Devendra Fadnavis inaugurating the newly equipped police station building. Neighbor MLA Seema Hire and dignitaries.esakal

Devendra Fadnavis Nashik Daura : नुसती चांगली इमारत उभारून फायदा नाही तर पोलिस ठाण्याचा कारभारदेखील चांगला दिसला पाहिजे, असे मत शनिवारी (ता. १०) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

आमदार सीमा हिरे यांच्या निधीतून ५ कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या सातपूर पोलिस ठाण्याची प्रशस्त नवीन इमारत लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. (Deputy Chief Minister Fadnavis statement of Administration should be equipped like building nashik news)

या वेळी व्यासपीठावर ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री दादा भुसे, आमदार सीमा हिरे, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त चंद्रकांत खांडवी, उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर देशमुख, सातपूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रणजित नलावडे आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की कायद्याबाबतचा १९७० नंतर आकृतिबंध बदलला नाही. आम्ही नुकताच आढावा घेऊन नवीन आकृतिबंध तयार केला असून त्याचा आम्हाला आनंद आहे. आता गुन्ह्याचे प्रकारदेखील बदलले असून त्यामुळे नवीन लोकसंख्येवर आधारित नवीन पोलिस ठाण्याची निर्मिती करण्यात येणार आहे.

Deputy Chief Minister Devendra Fadnavis inaugurating the newly equipped police station building. Neighbor MLA Seema Hire and dignitaries.
Devendra Fadnavis Nashik Daura : पंचवटीतील नाट्यगृहाचे आज उद्घाटन

त्यात अधिकारी अंमलदार यांची संख्यादेखील ठरवण्यात येणार आहे. महाराष्ट्राचे सर्व पोलिस ठाणे हे ऑनलाइन केलेले आहेत. यामुळे तक्रारदारांना तक्रार करण्यासाठी हेलपाट्या मारावा लागत नाही. ऑनलाइनमुळे एफआयआरमध्ये खाडाखोड करणे, एफआयआर नोंदवून न घेणे त्या गोष्टीला आळा बसला आहे.

सातपूर परिसरात मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग राहत असल्याने पोलिसांनी या सुसज्ज इमारतीतून ठाण्याचा चांगला कारभार चालवला पाहिजे. पोलिसांचे कामदेखील या इमारतीप्रमाणे सुंदर पाहिजे ,अशा सूचनादेखील त्यांनी या वेळी पोलिसांना केल्या. या वेळी त्यांनी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या कामाचे कौतुक केले. या वेळी भाजपचे ज्येष्ठ नेते महेश हिरे, माजी नगरसेवक राकेश दोंदे, भगवान दोंदे, डॉ. वैभव महाले, राकेश ढोमसे, राम पाटील, छाया देवांग आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमदार सीमा हिरे यांनी केले. सूत्रसंचालन रश्मी हिरे बेंडाळे यांनी केले. आभार उपायुक्त मोनिका राऊत यांनी मानले. दरम्यान, सातपूर पोलिस ठाण्याची नवीन इमारत, बालाजी मंदिर भव्य भक्ती निवास, सोमेश्वर धबधबा गोदावरी नदीवरील पूल बांधणे, छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, सीसीटीव्ही बसवणे कोटी आदी कामांचा लोकार्पण व भूमिपूजन सोहळा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हस्ते करण्यात आला.

Deputy Chief Minister Devendra Fadnavis inaugurating the newly equipped police station building. Neighbor MLA Seema Hire and dignitaries.
Devendra Fadanvis Nashik Daura : राज्यातील पहिल्या दिव्यांग प्रशिक्षण केंद्राचे आज लोकार्पण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com