आरोग्य उपसंचालक कार्यालयातील अधिकाऱ्यास अटक; 20 हजारांची मागितली लाच | latest marathi news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bribe Crime News

आरोग्य उपसंचालक कार्यालयातील अधिकाऱ्यास अटक; 20 हजारांची मागितली लाच

नाशिक : सेवानिवृत्त वैद्यकीय आधिकाऱ्याकडे सेवानिवृत्तीनंतरचे बील मंजूर करुन देण्यासाठी 20 हजारांची लाच घेणाऱ्या आराेग्य सेवा उपसंचालक कार्यालयातील मुख्य प्रशासकीय आधिकाऱ्याला बुधवारी (ता 24) दुपारी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ अटक केली. गजानन मारोतराव लांजेवार असे या लाचखोर अधिकार्याचे नाव आहे. (Deputy Health Director Office Administrative Officer Arrested Demanded bribe of 20 thousand nashik crime latest marathi news)

हेही वाचा: Weather Update : अतिवृष्टीमुळे राज्यात १८ लाख हेक्टर क्षेत्र बाधित

या प्रकरणातील तकारदार हे सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी असून त्यांचे सेवानिवृत्तीनंतरचे रजा रोखीकरणाचे बील मंजूर करणे बाकी हाेते. ते मंजूर करण्यासाठी लांजेवार यांनी तक्रारदार निवृत्त डाॅक्टरकडे 20 हजारांच्या लाचेची मागणी केली. त्यानंतर त्यांनी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली हाेती.

त्यानंतर एसीबीचे अधिक्षक सुनिल कडासने, अपर अधिक्षक नारायण न्याहाळदे व उपअधिक्षक सतिष भामरे यांच्या सूचनेनंतर सापळा पथकाने पडताळणी करुन (ता.24) बुधवारी लांजेवार यांच्या कार्यालयात सापळा रचला. त्यावेळी त्यांनी तक्रारदार निवृत्त डाॅक्टरकडे 20 हजारांची लाच मागून दालनात स्विकारल्याने त्यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. लांजेवार यांच्यावर भद्रकाली पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरु हाेते.

हेही वाचा: सासरच्या छळास कंटाळून जावयाची आत्महत्या; आत्महत्येपुर्वी केला Video शुट

Web Title: Deputy Health Director Office Administrative Officer Arrested Demanded Bribe Of 20 Thousand Nashik Crime Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..