Nashik Homethon 2023 : ‘होमेथॉन 2023’ प्रॉपर्टी एक्स्पोमधून दिसतोय नाशिकचा विकास : प्रार्थना बेहेरे

प्रदर्शनाला नाशिककरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, दोन दिवसांत ९९ घरांचे बुकिंग
development of Nashik can be seen from Homethon 2023 property expo
development of Nashik can be seen from Homethon 2023 property expo esakal

Nashik Homethon 2023 : होमेथॉन २०२३ प्रॉपर्टी एक्स्पोमधून नाशिकचा होणारा विकास दिसून येत आहे. पुढच्या पाच वर्षांत पुणे-मुंबईला मागे टाकेल.

येथील आल्हाददायक, निसर्गरम्य वातावरण, संस्कृती, राहणीमान मनाला आनंद देणारे आहे. (development of Nashik can be seen from Homethon 2023 property expo nashik news )

त्यामुळे नाशिकमध्ये घर घ्यायला आवडेल, अशी भावना नरेडको आयोजित होमेथॉन २०२३ प्रॉपर्टी एक्स्पोची ब्रँड अम्बेसेडर अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांनी व्यक्त केली. नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल (नरेडको) ‘होमेथॉन २०२३’ प्रदर्शनात शुक्रवारी (ता. २२) विशेष मुलाखतीत त्या बोलत होत्या.

व्यासपीठावर नरेडको नाशिकचे अध्यक्ष अभय तातेड व वंदना तातेड, होमेथॉनचे समन्वयक जयेश ठक्कर व जयश्री ठक्कर, सचिव सुनील गवादे व गीता गवादे, होमेथॉनचे सहसमन्वयक शंतनू देशपांडे व आसावरी देशपांडे, पुरुषोत्तम देशपांडे व शाल्मली देशपांडे, भूषण महाजन व मृणाल महाजन, अविनाश शिरोडे, टायटल स्पॉन्सर दीपक चंदे व दीपा चंदे, माही या नरेडको वूमन विंगच्या अध्यक्षा स्मिता पाटील आदींची उपस्थिती होती.

अभिनेत्री प्रार्थना म्हणाल्या, नरेडकोने होमेथॉनच्या माध्यमातून १५ लाख ते अगदी १२ कोटी रुपयांपर्यंतची घरे उपलब्ध करून दिली आहेत. खरं म्हणजे सगळ्यांसाठी घर ही संकल्पना घेऊन नरेडकोने आयोजित केलेले हे प्रदर्शन बघून खूप आनंद वाटला. ज्या वेळी मी या प्रदर्शनातील विविध स्टॉल्सला भेटी दिल्या तेव्हा आपण खरंच नाशिकमध्ये आहोत का, यावर विश्वासच बसला नाही.

नाशिकचा हा विकास पाहून नाशिक पुढील पाच वर्षांत मुंबई, पुण्यालाही मागे टाकेल यात शंका नाही. घर म्हणजे काही नुसत्या चार भिंती नव्हे, तर जिथे राहून आपल्याला आनंद मिळतो ते माझं घर. आज नाशिकमध्ये येऊन मलाही आनंद झाला. खरं म्हणजे नाशिक हे माझं घरच असल्याचे त्यांनी सांगितले.

development of Nashik can be seen from Homethon 2023 property expo
Property Tax : पुढील आर्थिक वर्षात मिळकतकरात वाढ नाही

नाशिकमधील गेटेड कम्युनिटी मला खूप भावली. विशेष म्हणजे, सुरक्षा महत्त्वाची असते. दुसरं म्हणजे, लहान मुलांना मित्र-मैत्रिणी भेटतात त्यामुळे मित्रांसमवेत एकत्र येण्याचा आनंद अशा गेटेड कम्युनिटीमधून मुलांना मिळतो. या माध्यमातून आपल्या परंपरा जपल्या जातात, असे त्यांनी सांगितले. माझे नाशिकशी भावनिक नाते आहे. ५ जानेवारीला माझा वाढदिवस असतो.

यादिवशी मी त्र्यंबकेश्वर, वणी गडावर, सप्तशृंगीदेवी आणि शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी नाशिकला येते. माझ्या पतीने अनेक चित्रपटांचं चित्रीकरण नाशिकमध्ये केलं आहे. इथली हवा, निसर्ग, खाद्यसंस्कृती आम्हाला खुणावते. त्यामुळे लवकरच नाशिकमध्ये घर घेणार असल्यांचे त्यांनी सांगितले. नंदन दीक्षित आणि किशोरी किन्हीकर यांनी मुलाखत घेतली.

सुरवातीला प्रार्थना बेहरे यांचा पैठणी देऊन सत्कार करण्यात आला. समन्वयक जयेश ठक्कर यांनी प्रास्ताविक केले. सुनील गवादे यांनी नरेडकोची, तसेच होमेथॉन प्रदर्शनाची माहिती दिली. या वेळी प्रार्थना बेहरेच्या हस्ते घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना चांदीचे नाणे भेट देऊन सत्कार करण्यात आला.

development of Nashik can be seen from Homethon 2023 property expo
Property Tax : मालमत्ता करप्रकरणी शाळांचे चालक मुख्यमंत्र्यांना भेटणार

होमेथॉन प्रदर्शनाच्या यशस्वितेसाठी मुख्य समन्वयक जयेश ठक्कर, सहसमन्वयक शंतनू देशपांडे, भूषण महाजन, सचिव सुनील गवादे, भाविक ठक्कर, प्रशांत पाटील, पुरुषोत्तम देशपांडे, राजेंद्र बागड, अश्विन आव्हाड, अविनाश शिरोडे, शशांक देशपांडे, नितीन सोनवणे, मयूर कपाटे, भूषण कोठावदे, हर्षल धांडे, अभय नेरकर आदी प्रयत्नशील आहेत.

प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रदर्शनाला शुक्रवारी १४ हजार नागरिकांनी भेट दिली. ६९ नागरिकांनी फ्लॅट, शॉप, प्लॉटचे बुकिंग केले. दोन दिवसांत २४ हजार नागरिकांनी भेट दिली असून, ९९ लोकांनी आपल्या घराचे स्वप्न साकार केले. या सर्व ग्राहकांना नरेडकोच्या वतीने चांदीचे नाणे भेट देण्यात आले. २५ डिसेंबरपर्यंत डोंगरे वसतिगृह मैदान येथे नागरिकांना प्रदर्शनाचा विनामूल्य लाभ घेता येणार आहे.

development of Nashik can be seen from Homethon 2023 property expo
Sakal Vastu Property Expo : घर घेण्यासाठी अनुकूल वातावरण; ‘पीएमआरडीए’चे आयुक्त महिवाल यांचे प्रतिपादन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com