Leopard
sakal
देवगाव: देवगाव फाटा शिवारातील शेतकरी चांगदेव पुंडलिक शिंदे यांच्या गट नंबर १९१/१ मध्ये उसाच्या शेताजवळ लावलेल्या पिंजऱ्यात शुक्रवार (ता. २१) सकाळी सहाच्या सुमारास बिबट्या जेरबंद झाला. घटनेची माहिती वनविभागाला कळविल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल घुगे, वनपाल मनमाड जयराम शिरसाठ घटनास्थळी दाखल झाले.