Dhule Lok Sabha Constituency : कांद्याच्या प्रश्नावरून नाराजीला भाजपंतर्गत गटबाजीची फोडणी

Lok Sabha Constituency : भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना मिळणारी सापत्न वागणूक, भाजपा पदाधिकाऱ्यांचा ओव्हर कॉन्फिडन्स आदी बाबींमुळे डॉ. बच्छाव यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला.
 Subhash Bhamre, Shobha Bachhao
Subhash Bhamre, Shobha Bachhaoesakal

नामपूर : धुळे लोकसभा मतदारसंघात अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या माजी आरोग्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव यांनी नियोजनबद्ध प्रचाराची व्यूहरचना करीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांची मोट बांधून भाजपचे विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे यांचा पराभव करून भाजपचा गड सर केला. (Dhule Lok Sabha Constituency)

भाजप पदाधिकाऱ्यांतर्गत असणारी गटबाजी, तालुक्याच्या आदिवासी भागात काँग्रेसला झालेले विक्रमी मतदान, कांद्याचे घसरलेले भाव, केंद्र सरकारने कांद्यावर लादलेली निर्यातबंदी, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना मिळणारी सापत्न वागणूक, भाजपा पदाधिकाऱ्यांचा ओव्हर कॉन्फिडन्स आदी बाबींमुळे डॉ. बच्छाव यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला.

बागलाण तालुक्यात गेल्या दहा वर्षात प्रलंबित सिंचन प्रकल्पासह रस्ते, जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना, ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा आदी कोट्यवधी रुपयांची विकासकामे करूनही गत निवडणुकीपेक्षा घटलेल्या मताधिक्क्यामुळे पक्षाचा झालेला पराभव भाजपच्या पदाधिकाऱ्यांना आत्मपरीक्षण करायला लावणारा आहे.

२०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत डॉ. भामरे यांना बागलाण तालुक्यातून ७२ हजार २५३ मतांची आघाडी असताना यंदा मात्र ५१ हजार मतांची आघाडीत घट झाल्याने डॉ. भामरेंची हॅटट्रिक चुकली. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या धुळे मतदारसंघात पंधरा वर्षांपासून 'कमळ' फुलल्याने यंदा भाजपकडून इच्छुकांची संख्या सर्वात जास्त होती. परंतु महायुतीतर्फे डॉ. सुभाष भामरे यांनाच उमेदवारी मिळाली. (latest marathi news)

 Subhash Bhamre, Shobha Bachhao
Dhule Lok Sabha Election 2024 Result : बागलाण विधानसभेतील कांदाप्रश्नाची धग, अडंरकरंट न जाणणे ठरले घातक!

महाविकास आघाडीकडून कोण उमेदवारी करणार याबाबत मतदारांमध्ये उत्सुकता होती. अनेक नावांच्या चर्चेनंतर नाशिकच्या माजी महापौर, माजी आरोग्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव यांची काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झाल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. परंतु अत्यंत कमी वेळात राजकीय चातुर्य पणाला लावून डॉ. बच्छाव यांनी विजयाची पताका लावून काँग्रेसने आपला बालेकिल्ला परत मिळविला.

तालुक्यात भिल्ल, कोकणा, महादेव कोळी, पारधी आदी आदिवासी समाजाचे मतदार सर्वाधिक असल्याने बागलाण विधानसभा मतदारसंघ गेल्या पन्नास वर्षांपासून अनुसूचित जमाती (एसटी) साठी आरक्षित आहे. बागलाण तालुक्यात कोट्यवधी रुपयांची विकासकामे झाली असली तरी आदिवासी गावांकडे खासदारांची तुटलेली नाळ, निकृष्ट दर्जाची होणारी विकासकामे आदी बाबींमुळे आदिवासी भागातील मतदार विद्यमान खासदारांवर कमालीचे नाराज होते.

त्याची परिणती मतपेटीच्या माध्यमातून दिसून आली. त्यामुळे आदिवासी भागातील सुमारे ४५ गावांमधून डॉ. बच्छाव यांना २५ हजार मतांची आघाडी मिळाली. त्यात साल्हेर, वाघांबा, मानूर, भीमखेत, कांद्याचा मळा, भवाडे, जाखोड, बोरदैवत, परशुराम नगर, बाभुळणे, आलियाबाद, अजंदे, गौतम नगर, जाड.

 Subhash Bhamre, Shobha Bachhao
Dhule Lok Sabha Election 2024 Result : मालेगाव बाह्यमध्ये भामरेंना मताधिक्क्य, डॉ. बच्छावांचीही पाठराखण!

देवठाणपाडे, गणेशनगर, माळीवाडा, जैतापूर, गोळवाड, धनाळेपाडा, मोहोळंगी, बोऱ्हाटे, भीलवाड, तुंगणदीगर, करंजखेड, चापपाडा, कपालेश्वर, साकोरे, भावनगर, तताणी, वाठोडा, केळझर, भिलदर, पठावे, वाठोडा, मानुरपाडा, साळवण मळगाव पिसोरे आदी गावांचा समावेश आहे.

नगरसेवक ते मंत्री प्रवास

डॉ. शोभा बच्छाव कॉंग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्या असून, राजकारणात जायंट किलर म्हणून त्यांची ख्याती आहे. नाशिक विधानसभा मतदारसंघात निवडणुकीत त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या एका वजनदार व माजी आरोग्यमंत्र्याचा पराभव केला होता. नाशिकच्या महापौर ते राज्याच्या आरोग्यमंत्रिपदाची धुरा त्यांनी यशस्वीपणे सांभाळलेली आहे. नगरसेवकपदापासून ते राज्याच्या आरोग्यमंत्रीपर्यतचा त्यांचा प्रवास नक्कीच संघर्षमय होता.

 Subhash Bhamre, Shobha Bachhao
Dhule Lok Sabha Election : डॉ. बच्छावांच्या माहेरी पुन्हा एकदा दिवाळी! लेक आता दिल्लीला निघाल्याचा अपूर्व आनंद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com