Nashik News: मालेगावला चिमुकल्यांवर अवघड शस्त्रक्रिया यशस्वी! महिन्याच्या उपचारानंतर नवजात शिशू ठणठणीत

surgery file photo
surgery file photoesakal

Nashik News : शहरातील दोन चिमुकल्यांना जन्मजात विसंगती होत्या. या चिमुकल्यांवरील अवघड शस्त्रक्रिया येथील प्रयास हॉस्पिटलमध्ये शिशू विभागात यशस्वीरीत्या पार पडल्या. महिन्याच्या उपचारानंतर नवजात शिशू ठणठणीत झाले.

यानंतर त्यांचा पालक, कुटुंबीयांसह हॉस्पिटलच्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. (difficult surgery on babies successful After months of treatment newborn Nashik News)

अन्ननलिका व श्वसन नलिका चिकटलेली (ट्रेकीओ एसोफेजल फिस्टुला) असलेल्या दोन नवजात बालकांना प्रयास हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. संतोष माळी व शाहीद अख्तर अशी या चिमुकल्यांची नावे होती.

घरची परिस्थिती बेताची असल्याने प्रयास हॉस्पिटलमधील नवजात शिशू विभाग (एनआयसीयू) खर्च व उपचार त्यांच्यासाठी अवघड होता. मात्र शासनाच्या महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेची हॉस्पिटलमध्ये सुविधा असल्याने त्यांची सोय झाली.

एकाची अन्ननलिका, श्‍वसननलिका चिकटलेली तर दुसऱ्या बाळाला कठीण इंट्यूबेशनसह अनेक जन्मजात विसंगती होत्या.

बाल शल्यचिकित्सक डॉ. सतीश कापडणीस यांनी या दोन गुंतागुंतीच्या आणि गंभीर शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्या. शस्त्रक्रियेदरम्यान भूलतज्ज्ञ डॉ. श्रुती लोया यांनी मोठ्या खुबीने हा प्रश्‍न हाताळला. दोन्ही मुलांवर आठ दिवसांच्या अंतराने एक-एक करून शस्त्रक्रिया करण्यात आली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

surgery file photo
SAKAL Impact: तोरंगण पाड्यावर चिरांचे बनवले स्मारक! चौदाशेच्या शतकांच्या 20 चिरांचे संवर्धन

शस्त्रक्रियेनंतर दोन्ही मुलांचे उपचार नवजात शिशु विभागात (एनआयसीयू) करण्यात आले. त्यांना तीन दिवस कृत्रिम श्वास देण्यात आला.

एक महिना (दीर्घकाळ) नवजात शिशु विभागामध्ये (एनआयसीयूमध्ये) सेप्सिस आणि श्वासोच्छवासाचा त्रास सहन करावा लागला. त्यांचे व्यवस्थापन डॉ. पियुष रणभोर, डॉ. वीरेंद्र पाटील, डॉ. अभय पोतदार आणि या विभागातील डॉक्टर व नर्सिंग स्टाफ यांनी केले.

महिन्याच्या उपचारानंतर दोन्ही बाळांचे वजनात वाढ झाली. दूधही व्यवस्थित पचायला लागले. लागोपाठ दोन श्वसननलिका-एसोफेजियल फिस्टुला बाळांना जगणे अत्यंत दुर्मिळ आहे. ज्यांना एनआयसीयू व्यवस्थापनाची गरज आहे.

प्रयास हॉस्पिटलमध्ये एनआयसीयू डॉक्टर, ड्यूटी मेडिकल ऑफिसर आणि नर्सिंग स्टाफ यांनी शस्त्रक्रियेनंतरही महिनाभर नियमित देखभाल व काळजी घेऊन दोन्ही बालकांना जीवदान देण्यात हातभार लावले.

surgery file photo
Water Crisis: चणकापूर, हरणबारीच्या जलसाठ्यात वाढ! गिरणातील जलसाठ्यात मात्र घट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com