
Digital Arrest Shock in Nashik Two Seniors Lose 7 Crore in Fake Legal Action Scam
Esakal
नाशिकमध्ये दोन सेवानिवृत्त झालेल्या ज्येष्ठ नागरिकांची कोट्यवधींची फसवणूक करण्यात आलीय. डिजिटल अरेस्टचा बनाव रचत एकाला ६ कोटी २५ लाख तर दुसऱ्याला ७१ लाख रुपयांना गंडा घातला आहे. डिजिटल अरेस्टचा बनाव रचताना थेट सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या कोर्टात हजर केल्याचं सांगण्यात आल्याचंही उघडकीस आलं. या प्रकरणी पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.