नाशिक: जीर्ण इमारती बनल्या गुन्हेगारांचा अड्डा

वसाहतींचा रुग्णालयासाठी वापर करण्याची मागणी
nashik
nashiksakal

नाशिक रोड : पडीक इमारतीत अल्पवयीन मुलीवर(small girl) अत्याचार झाल्यानंतर आता शासनाच्या पडक्या घरांचा(Fallen house) विषय सध्या ऐरणीवर आला आहे. गांधीनगर प्रेस आणि नेहरूनगर प्रेस येथील वसाहतींमध्ये(Colonies) सध्या अनेक घरे पडकी आहे. त्यामुळे या घरांचा वापर सध्या गुन्हेगार सर्रास करीत आहे. नाशिक रोड, उपनगर पोलिस स्टेशन बरोबरच प्रेसच्या सुरक्षा व्यवस्थेचे ही या गोष्टीकडे सर्रास दुर्लक्ष होत आहे.

nashik
नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका वेळेतच होण्याची शक्यता

अल्पवयीन मुलीला नाशिक-पुणे मार्गावरील गांधीनगरमधील निवासी इमारतीत नेऊन एकाने बळजबरीने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या अल्पवयीन मुलीने बाळाला जन्म दिला आहे. संशयितांविरुद्ध उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेहरूनगर आणि गांधीनगर प्रेसच्या वसाहतीत अनेक इमारती पडीक आहेत. या ठिकाणी जुगार, गांजा ओढणे, मद्यपान करणे, हत्यारे लपविणे, मारामाऱ्या करणे, मुलींना नेऊन अत्याचार करणे असे गुन्हे(nashik crime news) सध्या या वसाहतींमध्ये घडत आहे. या वसाहतींमध्ये सध्या विरळ लोकसंख्या आहे शिवाय जीर्ण झालेल्या इमारती अखेरची घटका मोजत आहे.

या इमारतीत सध्या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या टोळ्या सक्रिय होऊन गुन्हेगारीचे केंद्र बनवत आहे. नेहरूनगर आणि गांधीनगरच्या सरकारी प्रेसमधील कर्मचाऱ्यांसाठी निवासी इमारती बांधण्यात आल्या. कालांतराने प्रेसची कर्मचारी संख्या कमी झाली. त्यामुळे अनेक इमारती पडीक आहेत. तेथे सुरक्षारक्षक, पथदीपही नाहीत. बहुसंख्य इमारतींचे दरवाजे, खिडक्या चोरट्यांनी नेल्या आहेत. परिसरातील गर्दुल्ले, मद्यपी या इमारतींमध्ये नशा करतात. परिसरातील रहिवासी गुंडगिरीमुळे वैतागले आहेत. त्यांनी गुंडांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.

nashik
नाशिक महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीचे संकेत - छगन भुजबळ

या वसाहतींना प्रशासनाने संरक्षण द्यायला हवे अथवा या ठिकाणी सरकारी कार्यालये, औषध उपचार केंद्र, लघुउद्योग, दवाखाना सुरू केल्यास या जागेचे संरक्षण होईल व गैरवापर टळेल.

- कपिलदेव शर्मा, रहिवासी, गांधीनगर

nashik
नाशिकमध्ये रुग्णालयात उपचाराचे प्रमाण सात टक्के

जीर्ण झालेल्या इमारतींची डागडुजी करून सुसज्ज हॉस्पिटल होऊ शकते. केंद्र शासनाने या जागेचा लोक सेवेसाठी सुयोग्य वापर करायला हवा. शासनाचा कोणताही कारखाना या जागेत होऊ शकतो जेणेकरून रोजगाराची मुबलक संधी उपलब्ध होईल.

- रवी पगारे, युगांतर फाउंडेशन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com