नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका वेळेतच होण्याची शक्यता

राजकारण तापण्यास सुरवात; निवडणुकीच्या तयारीला वेग
election
electionsakal

नाशिक : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) देशातील पाच राज्यांतील पंचवार्षिक निवडणुकीला हिरवा कंदील (green light for election) दाखविताना मार्चपर्यंत निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केल्याने महापालिका निवडणुकादेखील त्याच मार्गाने होतील असा अंदाज लावला जात असून त्या दृष्टीने राजकारण तापण्यास सुरवात झाली आहे.

election
चित्रपटात काम देण्याच्या नावाखाली अभिनेत्रीचा विनयभंग; आरोपी अटकेत

केंद्रीय निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा, मणिपूर या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा केली. त्यामुळे राज्यातील महापालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यातील १८ महापालिकांच्या निवडणुका या वर्षी अपेक्षित आहे. औरंगाबाद, नवी मुंबई, कल्याण- डोंबिवली, कोल्हापूर, सोलापूर या महापालिकांची मुदत यापूर्वीच संपुष्टात आली. या आधीच्या व या वर्षी मुदत संपुष्टात येणाऱ्या महापालिकांच्या निवडणुकीबाबत संभ्रम आहे. कोविडमुळे या निवडणुका लांबणीवर पडतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरवेळी दहा जानेवारीच्या आत महापालिका निवडणुकांसाठी आचारसंहिता जाहीर केली जाते.

election
नाशिक महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीचे संकेत - छगन भुजबळ

त्यानंतर निवडणूक कार्यक्रम घोषित केला जातो. परंतु, नाशिकसह १८ महापालिकांची निवडणूक कार्यक्रम अद्यापही घोषित झालेला नाही. त्यामुळे किमान दोन ते सहा महिने निवडणुकीचा कार्यक्रम पुढे ढकलला जाईल असा अंदाज व्यक्त केला जात होता. त्यात इतर मागासवर्गीय आरक्षण, नगरसेवकांची ढोबळमानाने वाढविण्यात आलेली संख्या या विरोधात न्यायालयात याचिका दाखल आहे. त्यामुळे या याचिकांवरील सुनावणी प्रलंबित आहे. पुन्हा कोरोना संसर्गाचा वेग वाढू लागल्याने त्यात आणखी भर पडली. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून निवडणुका पुढे ढकलण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. परंतु, केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यातील निवडणुकांचा कार्यक्रम घोषित केल्याने महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेत पार पडतील असा अंदाज बांधत निवडणुकीच्या तयारीला वेग आला आहे.

election
Marathwada Corona Update : ८७३ कोरोनाग्रस्त

जानेवारीअखेर प्रभागरचना

नाशिक महापालिकेत ४४ प्रभाग अस्तित्वात येणार आहेत. त्यातील ४३ प्रभाग तीन नगरसेवकांचे, तर एक प्रभाग चार नगरसेवकांचा असे एकूण १३३ नगरसेवक निवडून येतील. प्रभागरचनेचा आराखडा राज्य निवडणूक आयोगाला सादर करण्यात आला आहे. त्यानुसार जानेवारीअखेरीस प्रभागरचना जाहीर होऊन पुढे पंधरा दिवसात हरकती व सूचना मागविल्या जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com