
नाशिक : येसगाव खुर्दच्या वायव्य दिशेस असलेला मोठा वटवृक्ष गावाच्या वैभवात भर घालणारा आहे. मोठ्या विशालकाय फांद्या, पारंब्या व हिरव्यागार पानांनी नटलेला हा वृक्ष सहज नजरेत भरतो. अचानक कोणाची दृष्ट लागावी अशी अवस्था सध्या या वृक्षाची झाली आहे.
अद्यापपर्यंत कोणताही रोग आलेला नव्हता
गेल्या तीन आठवड्यांपासून झाडावर लहान एक ते सव्वा सेंटिमीटर लांबीच्या पाठीवर तपकिरी, पिवळसर व पोटाखाली सफेद रंग असलेल्या बारीक अळ्यांचा मोठ्या प्रमाणात पानांवर प्रादुर्भाव झाल्याने केवळ सांगाडा उभा आहे. आळ्यांनी झाडावरील एकूण एक पान खाल्ल्यामुळे झाड बोडके झाले आहे. उर्वरित पाने झाडावरच वाळून जात आहेत. 187 वर्षे झालेल्या या झाडावर अद्यापपर्यंत कोणताही रोग आलेला नव्हता, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. वटवृक्षाचे झाड गावाच्या दर्शनी भागावर असल्यामुळे व त्याचा विस्तार मोठा असल्याने हे झाड म्हणजे गावाची शान मानले जाते. होम पूजेसाठी वाळलेल्या काड्यांचा उपयोग केला जातो.
गर्द छाया देणारा वृक्ष फक्त फांद्या, काड्यांचा सांगाड्यांच्या रूपाने उभा
गाव व परिसरात सुवासिनींचा जिव्हाळ्याचा हा एकच वटवृक्ष असल्यामुळे वट सावित्री च्या दिवशी परिसरातील महिला पूजेसाठी येतात. झाडाच्या बाजूला असलेल्या पीर बाबाची यात्राही या झाडाच्या परिसरातच भरते. विस्तीर्ण घेरामुळे भर उन्हाळ्यात झाडाच्या पाराभोवती वाटसरू विश्रांती घेतात. झाडाखाली पिण्याच्या पाण्याची सोय केली जाते. अक्षयतृतीयेला गावातील सासुरवाशीनी व मुली या झाडांच्या फांद्यांवर झोका बांधून गाणे म्हणून आनंद लुटतात. गाव व परिसरातील सर्व पक्षांचे विश्रांतीचे स्थान हा वृक्ष आहे. लालचुटूक फळांनी जेव्हा हा वृक्ष बहरतो तेव्हा परिसरा तील अनेक पक्षी फळांची चव चाखायला येतात. मात्र, अळ्यांचा प्रादुर्भाव झाल्याने यंदा पक्ष्यांना फळांची चव चाखायला मिळते का नाही याबाबत शंका आहे. तसेच कोवळ्या पानांना अळ्यांनी खाऊन टाकले तर गर्द छाया देणारा वृक्ष फक्त फांद्या, काड्यांचा सांगाड्यां च्या रूपाने उभा राहिलेला दिसेल.
हेही वाचा > शिवसेनेकडून "स्थायी'साठी अतिरिक्त जागेची मागणी
अमेरिकन अळ्यांनी हल्ला चढविला
यंदा मका, बाजरी या खरीप पिकांवर अमेरिकन अळ्यांनी हल्ला चढविला होता. शेतात सर्वत्र अळ्यांचे साम्राज्य पसरले होते. तसे या विशाल वृक्षावर अळ्यांचे साम्राज्य पसरले आहे. सकाळी झाडाखालून जाताना अळ्या अंगावर पडतात. अळ्या चावल्यास अंगाला खाज सुटते. त्यामुळे झाडाखाली कोणीही थांबत नव्हते. शेवटी ग्रामपंचायतीने लक्ष घालून सुरेश शेलार, संजय शेलार, मोठाभाऊ शेलार, श्रीराम पाटील आदींच्या सह कार्याने झाडाच्या शेंड्यापर्यंत औषध फवारणी केली.
लक्ष घालून औषध फवारणीची उपाययोजना
वडाचे हे झाड आमच्या आजोबांनी लावलेले आहे. रोपाचे वृक्षात रूपांतर होईपर्यंत देखभाल व काळजी परिवाराने घेतली. झाड नवीन पानांनी बहरावे यासाठी ग्राम पंचायतीने लक्ष घालून औषध फवारणीची उपाययोजना केली. त्यामुळे नवीन पालवी फुटण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. -दिलबर शेलार, ज्येष्ठ नागरिक, येसगाव खुर्द
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.