Nashik : वादग्रस्त उड्डाणपुलाचा वाद पालकमंत्र्यांच्या दरबारी

आयुक्त केेलास जाधव यांना चौकशीच्या सूचना
flyover in nashik
flyover in nashikesakal
Summary

आयुक्त केेलास जाधव यांना चौकशीच्या सूचना

नाशिक : त्रिमूर्ती चौक व मायको सर्कल येथील प्रस्तावित उड्डाणपुलाचा(Proposed flyover) वाद पालकमंत्री छगन भुजबळ(minister chagan bhujbal) यांच्याकडे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी पोचविल्यानंतर उचित कारवाईच्या सूचना देताना महापालिका आयुक्त कैलास जाधव (Municipal Commissioner Kailas Jadhav)यांना प्रक्रियेची चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, या प्रकरणात भाजपचे नगरसेवक मुकेश शहाणे यांच्याकडून उच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाणार असल्याने उड्डाणपुलाचा वाद आता नवीन वळण घेताना दिसत आहे.(Dispute over flyover problem in Guardian Minister's chagan bhujbal court)

flyover in nashik
Omicronमुळे लगीनघाईला पुन्हा एकदा ब्रेक लागण्याची शक्यता...

मायको सर्कल व सिडकोतील त्रिमूर्ती चौकात उभारल्या जाणाऱ्या उड्डाणपुलाचा वाद रोज नवीन वळणे घेत आहे. सुरवातीला मायको सर्कल येथेच पूल उभारला जाणार होता. परंतु, नंतर त्रिमूर्ती चौकाचा समावेश करण्यात आला. अवघी ८५ कोटी रुपयांची तरतूद असताना अडीचशे कोटी रुपयांपर्यंत पुलाची किंमत वाढविण्यात आली. त्यानंतर निविदा निघाल्यानंतर सिमेंटची ग्रेड ४५ वरून ६० करण्यात आली. बदल करताना ठेकेदाराला पोषक धोरण स्वीकारले गेले. संरचना बदलत असताना नवीन निविदा काढणे गरजेचे होते, परंतु तसे न करता आहे त्या आराखड्यानुसारच पूल तयार करण्यास मान्यता दिल्यानंतर भाजप नगरसेवक मुकेश शहाणे यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला.

flyover in nashik
नाशिक : जिल्ह्याची ॲक्‍टिव्‍ह रुग्‍ण 8 हजारांच्‍या उंबरठ्यावर

नगरसेवकांचा पुलाच्या कामावरून संशय वाढताना ते आक्रमक भूमिका घेत आहेत. निविदा प्रक्रियेत दोन कंपन्यांनी सहभाग घेतल्यानंतर तिसऱ्यांदा निविदा काढणे अपेक्षित असताना घाईत निविदा प्रक्रिया गुंडाळण्यात आली. ट्रॅफिक सर्वेक्षण न करता उड्डाणपुलाचा प्रस्ताव तयार केला गेला. यासारखे अनेक मुद्दे समोर आल्याने पुलाच्या कामातील अडथळे अद्यापही दूर होताना दिसत नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी उड्डाणपुलाच्या निविदा प्रक्रियेवर संशय घेत पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे तक्रार केली होती. त्या अनुषंगाने महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी उचित कारवाई करण्याच्या सूचना पालकमंत्री भुजबळ यांनी दिल्या. दरम्यान, या प्रकरणात नगरसेवक शहाणे उच्च न्यायालयात(high court) धाव घेणार असून, सोमवारी (ता. १७) जनहित याचिका दाखल करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

flyover in nashik
36 झाडांची अवैध कत्तल, नाशिकमध्ये ठेकेदाराला 20 लाखांचा दंड

उड्डाणपुलाला विरोध नाही, परंतु पुलाचे काम देताना घोटाळा झाल्याचा संशय आहे. पालकमंत्री भुजबळ(minister chagan bhujbal) यांनी दखल घेताना कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार(deputy cm ajit pawar) व नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे (minister eknath shinde)यांच्याकडे दाद मागू. अनियमिततेच्या चौकशीची मागणी केली जाणार आहे.

- रंजन ठाकरे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com