Nashik News: रानवडला शेतकऱ्यांना कर्जमुक्ती प्रमाणपत्राचे वाटप; दिल्लीच्या धार्मिक एकता ट्रस्टचे अभियान

Loan waiver certificate issued to farmers. Application form to be filled by farmers in second photograph.
Loan waiver certificate issued to farmers. Application form to be filled by farmers in second photograph.esakal

नैताळे : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह पतसंस्था व राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांकडील कर्जवसुलीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत असताना, निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांना दिल्लीच्या धार्मिक एकता ट्रस्टतर्फे कर्जमुक्ती प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. बँकांच्या अधिकाऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले.

यामुळे सर्वच बँकांच्या कर्जवसुलीवर परिणाम होणार आहे. याबाबत कर्जदार शेतकऱ्यांपुढे मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने याची चौकशी करून खुलासा करावा, अशी मागणी होत आहे. (Distribution of loan waiver certificates to Ranwadla farmers Mission of Religious Ekta Trust of Delhi Nashik News)

रानवड (ता. निफाड) येथे दिल्लीच्या धार्मिक एकता ट्रस्टने कर्जमुक्ती अभियान सुरू केल्याची माहिती शेतकऱ्यांना मिळाली. त्यावरून परिसरातील शेतकऱ्यांनी रानवड गावाकडे धाव घेतली.

दिल्लीच्या धार्मिक एकता ट्रस्टचे लोक शेतकऱ्यांकडून कर्जातून बाहेर पडण्यासाठी ‘मोफत प्रशिक्षण’, अशा आशयाचा फॉर्म भरून घेत होते.

त्यावर शेतकऱ्याचे नाव, पिनकोड नंबर, लोकसभेचे नाव, ई मेल आयडी, व्हॅट्‌सॲप नंबर, राज्याचे नाव, घरातील कोणी नोकरी करताहेत का, असे कॉलम होते. तो अर्ज शेतकरी भरून देत होते.

Loan waiver certificate issued to farmers. Application form to be filled by farmers in second photograph.
SAKAL Impact: नळकस रस्त्याचे भाग्य उजळणार! प्रधानमंत्री ग्रामसडकमधून अडीच कोटींचा निधी उपलब्ध

त्यानंतर अनेक शेतकऱ्यांना कर्जमुक्ती प्रमाणपत्र वितरण होत होते. त्या प्रमाणपत्रावर राष्ट्रीय वित्त समिती, अध्यक्ष, कर्जमुक्ती अभियान म्हणून सीए सुरभी श्रीवास्तव यांची सही आहे.

या सगळ्या प्रकारामुळे कर्जदार शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण आहे. या अभियानाचा पत्रव्यवहार हिंदी भाषेतून आहे. यातून खरंच शेतकरी कर्जमुक्त होईल का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

"महाराष्ट्रात अनेक वर्षांपूर्वी शेतकरी संघटनेने असे कर्जमुक्ती अर्ज भरून घेतले होते. अगदी तोच प्रकार आहे. यामुळे बँकेच्या कर्जवसुलीवर परिणाम होऊ शकतो. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली आहे. कर्जवसुलीला अडथळा ठरणाऱ्या या अभियानाविरोधात सल्ला घेऊन योग्य कार्यवाई करू."

- आनंद गरुड, विभागीय अधिकारी, नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक

Loan waiver certificate issued to farmers. Application form to be filled by farmers in second photograph.
Nashik Recruitment News: पोलीस पाटील आणि कोतवाल पदासाठी 10 डिसेंबरला परीक्षा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com